ऑलिम्पिक साठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत
ऑलिम्पिक साठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

ऑलिम्पिक साठी आष्टीच्या अविनाश साबळेला राज्य शासनाची 50 लाखांची मदत

मुंबई दि 28 डिसेंबर/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडव्याचा अविनाश साबळे आता ऑलिम्पिक साठी तयारी करतोय.तो ऑलिम्पिक व्हावा म्हणून राज्य सरकारने पूर्व तयारीसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये अविनाश सह इतर 4 जणांना दिले आहेत.

मूळचा आष्टी तालुक्यातील मांडवा येथील अविनाश साबळे गेल्या अनेक वर्षांपासून अडथळयांच्या धावण्याच्या स्पर्धेत सराव करत आहे.त्याने यापूर्वी देशातील नामांकित स्पर्धेत भाग घेऊन पदके जिंकले आहेत.

मांडवा जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर अविनाशने पुणे येथे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश घेऊन आपले दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या पी एम मुनोत ज्युनिअर कॉलेज मध्ये 11 वी 12 वी चे शिक्षण पूर्ण केले.या दोन वर्षात त्याने प्रा.जमीर सय्यद सर यांच्या मार्गदर्शनाखाली 5000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय रेकॉर्ड केलं.त्यानंतर त्याने घरच्या परिस्थितीमुळे आर्मीत प्रवेश केला.सध्या अविनाश अडथळयांच्या शर्यतीचा करत आहे.
टोकियो येथे होणाऱ्या 2021ऑलिम्पिक स्पर्धेत तो सहभागी होत आहे.

टोकियो ऑलिम्पिक 2021मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये असे 2.50 कोटी रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली.

वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर ( शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत ( शूटिंग), तेजस्विनी सावंत ( शूटिंग), प्रवीण जाधव ( आर्चरी रिकर्व्हर सांघिक), अविनाश साबळे ( एथलेटिक्स) या 5 खेळाडूंना हे सहाय्य देण्यात आले. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी कोटा मिळाला आहे.

हेही वाचा:खाजगी ट्रॅव्हल बस आणि सॅनट्रो कार अपघातात चार जण ठार

मिशन ऑलिम्पिकअंतर्गत अशा स्वरूपाचे प्रोत्साहन देण्यात आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

 

*अविनाश गोल्ड जिंकेल – ना . धनंजय मुंडे*

भूमिपुत्र अविनाश साबळे आमचा अभिमान आहे त्याच्या लढ्यात सरकार काहीच कमी पडू देणार नाही टोकियो मधील ऑलम्पिक मध्ये तो सुवर्ण वेध घेऊन आमचे स्वप्न पूर्ण करील असा माझा विश्वास आहे . आष्टीच्या मातीने अनेक नेहमीच जिल्ह्याचे नाव देश व विदेशात गाजवले आहे अविनाश तोच वारसा जपत असल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे

Share this story