शाळा सुरू करण्यास ४ आँक्टोबरपासून टास्क फोर्स आणि मुख्यमंत्री यांची मान्यता
 शाळा

मुंबई-प्रतिनिधी 


 शाळा येत्या ४ आँक्टोबरपासून  सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.
 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे नियम पाळून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं पाठविला होता.
 त्याला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. 

शाळा कशा सुरु होणार याची नियमावली अद्याप शिक्षण विभागाने जाहीर केली नाही.

यापूर्वी आँगस्ट महिन्यात शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो स्थगित करावा लागला होता.

 कोरोनाची घटलेली रूग्णसंख्या, मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण विशेषतः शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणानंतर शाळा सुरू करण्याची मागणी होत होती.
 एक महिन्यापासूनच शाळा सुरु व्हायला पाहिजे होत्या. पण काही अडचणी आल्या. पण येत्या ४ तारखेपासून शाळा सुरु होणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड  यांनी दिली आहे. 
बऱ्याच जिल्ह्यात चांगल वातावरण आहे. तरीही त्या त्या जिल्ह्याची परिस्थिती पाहून शाळा सुरु केल्या जाणार आहेत. 
मात्र, पुन्हा कोरोना रुग्ण वाढले तर शाळा सुरु किंवा बंद करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार राहतील असंही  त्यांनी स्पष्ट केले आहे.
लाभाच्या योजनांसाठी लागणारी उपस्थिती ही विद्यार्थी शाळेत न आल्यासही धरली जाणार आहे. 

ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वीच्या शाळा सुरु होणार आहेत. तर शहरी भागातील 8 ते 12 च्या शाळा सुरु होणार आहेत. 
शाळा संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथे सांगितले कि, ग्रामीण भागातील 1 ली पासून शाळा सुरु करण्यात येणार आहेत. त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. शिक्षकांचे पूर्ण लसीकरण झाले असल्याने शाळा सुरु करण्यात येणार आहेत. 

 

Share this story