*आजोबाच्या प्रतिकाराने मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका*
*आजोबाच्या प्रतिकाराने मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका*

 

 

 

तिसगाव दि 25 प्रतिनिधी
आजबाने प्रतिकार केल्यानंतर नातवाची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाल्याची घटना आज पहाटे अहमदनगर जिल्ह्यातील पाडळी शिवारात घडली.

बिबट्याचे दिवसेंदिवस हल्ले वाढत आहेत .आष्टी तालुक्यातील सुरडी शिवारात काल बिबट्याच्या हल्ल्यात एक जण ठार झाला आहे.

 

पाडळी येथील धीरज गर्जे (वय-9 वर्षे) याच्यावर पहाटे साडेपाच वाजता
बिबट्याने हल्ला केला. त्याचे आजोबा कारभारी गर्जे यांनी काठीने बिबट्याला प्रतिकार केला म्हणुन धीरज प्राण वाचला. बुधवारी पहाटे साडेपाच वाजता म्हसोबा मंदीरा शेजारी गर्जे वस्तीवर मुळा कॅनॉलच्या बाजूला ही घटना घडली.

पहाटे आजोबा सोबत धीरज शौच्यासाठी बाहेर गेले होते.दरम्यान घरी परतताना आजोबा पुढे आणि धीरज मागे होता ,बिबट्याने पाठीमागून हल्ला केला.

हेही वाचा:बिबट्याच्या हल्ल्यात सुरडी पंचायत समिती  सदस्य पती ठार

Share this story