TUV कार आणि पिकअपची समोरासमोर जबरदस्त धडक ; एक ठार चार गंभीर
TUV कार आणि पिकअपची समोरासमोर धडक


कडा- प्रतिनिधी 
नगर- आष्टी रस्त्यावर TUV कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक ठार चार गंभीर जखमी झाले.ही  घटना  दि 14 रोजी रात्री उशिरा वाघळूज घाटात घडली.
रात्री उशिरा  वाघळूज घाटात नगरकडे जाणारी TUV कार आणि तिकडून येणारा पिकअप टेम्पो यांची समोरासमोर धडक झाली.घटनेची माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नगर येथे हलविले असल्याची माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे यांनी दिली. 

TUV
ही धडक इतकी भयानक होती कि, TUV गाडीचा चक्काचूर झाला आणि TUV गाडीतील एक जण जागीच ठार झाल्याचे कळते. तर पिकअप मधील चार जण गंभीर जखमी झाले. या घटनेत मृत झालेले एक डॉक्टर आहेत असे बेंबरे यांनी सांगितले. 
सकाळपर्यंत अधिक माहिती अपेक्षित आहे.

Share this story