केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कर्तव्यदक्षता
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कर्तव्यदक्षता

केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची कर्तव्यदक्षता  औरंगाबाद - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड

यांनी मंत्रीपदाचा शिष्टाचार बाजूला सारत विमानातील सहप्रवासी असलेल्या एका व्यक्तीवर प्रथमोपचार केले.

डॉ कराड हे काल इंडिगो विमानाने दिल्लीहून - मुंबई मार्गे औरंगाबादला येण्यासाठी निघाले होते. दिल्ली विमानतळावरून विमानाने

उड्डाण केल्यानंतर अचानक एका प्रवाशाचा रक्तदाब वाढला आणि तो बेशुद्ध होऊन सीटवरच कोसळला.

त्यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला. तो गोंधळ पाहून डॉ भागवत कराड आपल्या सीटवरून उठले आणि बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाच्या दिशेने गेले.

प्रवाशाची तपासणी केल्यानंतर त्यांनी तातडीने प्रथोमचार म्हणून सदर प्रवाशाला काही औषधी देण्यास सांगितले, त्यानंतर तो प्रवासी

शुद्धीवर आला. डॉ भागवत कराड यांनी योग्यवेळी प्रवाशावर उपचार दिल्याने पुढील अनर्थ टळला, त्यामुळे इतर प्रवाशांनी देखील

सुटकेचा निश्वास सोडला. डॉ भागवत कराड हे बालरोग तज्ञ व शल्यचिकित्सक आहेत. मराठवाड्यातील पहिले बाल शल्यचिकित्सक

म्हणून देखील त्यांची ओळख आहे.

सर्व जिल्हा रुग्णालयांचे १५ दिवसात हेल्थ ऑडीट करणार –आरोग्यमंत्री राजेश टोपे

Share this story