fbpx
क्राईमताज्या घडामोडी

*ऊसतोडणी मजुरांना घेऊन जाणाऱ्या अज्ञातांनी लावली आग;पुन्हा जाळपोळ*

शेअर करा

 

पाटोदा दि 23 प्रतिनिधी

पुसद होऊन ऊस तोडणी मजूर बारामती कडे घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अनपटवाडी जवळ अज्ञात व्यक्तींनी आग लावण्याची घटना सायंकाळच्या वेळी घडली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की पुसद येथून ऊस तोडणी कामगारांना घेऊन टेम्पो बारामती कडे चालला होता.पालखी मार्गावरील अनपटवाडी जवळ या टेम्पोला थांबवून चालकाला मारहाण करण्यात आली आणि कामगारांना खाली उतरविण्यात आले .त्यानंतर टेम्पो पेटवून देण्यात आला .यामध्ये ऊसतोडणी मुकादमाचे 6 लाख रुपये जळल्याचे समजते.
यापूर्वी आष्टी तालुक्यातील धिरडी येथेही असाच टेम्पो अज्ञात व्यक्तींनी जाळण्याचा प्रयत्न केला होता.यामध्ये टेम्पोचे नुकसान झाले होते.
दरम्यान घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून याबाबतचा तपास सुरू आहे.

हेही वाचा:*दुःखद बातमी;चप्पू उलटून तीन बुडाले

Advertisement

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close