ताज्या घडामोडीमराठवाडा

जिल्ह्यातील एकमेव हिरकणी कॉप-शॉपचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन

शेअर करा

जिल्ह्यातील एकमेव हिरकणी कॉप-शॉपचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उदघाटन

बीड दि 17 डिसेंबर, प्रतिनिधी

राज्यातील 500 गावांमधून बचत गटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांना हक्काचे विक्री केंद्र मिळावे म्हणून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून बीड मध्ये कॉप-शॉप चे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते दि 18 रोजी उद्घाटन होत आहे.

राज्यात 100 गावांचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान सुरू करण्यात आले.या अभियानातुन बीड जिल्ह्यातील अनेक गावांत विकास घडवून येत आहे. याचाच एक भाग म्हणून या 100 गावातील बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित होणारे वस्तूंची विक्री या कॉप-शॉप च्या माध्यमातून होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे व्यवस्थापक चंद्रकांत माळी यांनी दिली.

प्रत्येक जिल्ह्यात एक कॉप-शॉप सुरू करण्यात येत आहे.बीड जिल्ह्यातील कॉप-शॉप हे हिरकणी बचत गटाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाटत आहे.मान्यता प्राप्त वस्तूंची विक्री केली जाणार आहे.
या कार्यक्रमासाठी अमित चंद्रा संस्थापक ATE चंद्रा फौंडेशन , महाराष्ट्र ग्राम सामाजिक अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामनाथ सुब्रमण्यम, उपमुख्यकार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी हे उपस्थित असणार आहेत.

हेही वाचा: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आष्टी दोन लाचखोर पकडले

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close