ताज्या घडामोडीप.महाराष्ट्र

*पाण्यासाठी उरुळी देवाची ग्रामस्थांचे आंदोलन*

शेअर करा

 

पुणे दि 10 जुलै टीम सीएम न्यूज

पाण्यासाठी उरुळी देवाची गावातील नागरिकांनी सामाजिक अंतराचे भान ठेवत आणि काळी फित लावून आंदोलन करत पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला.
ए ग्रेड महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावातील लोकांची झाली आहे .पत्रे लिहली ,निवेदने दिली ,आक्रोश मांडला,प्रसार माध्यमांनी दखल घेतली पण महापालिका अजुन ही जागी होईना आणि उरुळी करांची दैना संपेना. या साठी ग्रामस्थांनी आज एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला.यावेळी महिला मोठ्या संख्येने आपापल्या घरासमोर आणि चौका चौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला .
लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही . मंतर वाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही .सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकर ला होणारी गर्दी टाळून पाइपलाइन ने पाणी सुरू करावी अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नाही . त्यामुळे आजचे आंदोलन करण्यात आले .
कोरोणा मुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून अजुन टँकर भोवती गर्दी जास्तच वाढत आहे याची दखल घेणे गरजेचे आहे.
ऊरूळी देवाची गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगर पालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे.शिवाय 10 दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकी ही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे .
कचराडेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही. सद्याची परिस्थिती करोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोना चा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोणा ला थांबवू शकतो .त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे .तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यावेळी यांनी केला .
टॅंकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे, शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो .यामुळे लोकांन्ना कोरोनाची लागण होवु शकते.त्यासाठी महापालीकेला जबाबदार धरले जाईल ,
आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करणेत यावे.अन्यथा उरुळी देवाची गावातील ग्रामस्थ अजुन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व उरुळी देवाची गावाचे माजी उपसरपंच व भारिप चे शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केले .यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब नेवसे, जय हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रतीक तांगडे , अक्षय नेवसे, ,पद्मावती ताई सिंगाडे ,नीलम ताई सो नमळे,भारतीताई धर्माधिकारी ,रुपालीताई तांगडे ,जयाताई नेवसे, अल्काताई बहुले, जाईबाई बहुले, पोर्णिमाताई बहुले, बोलेनाथ भाडळे ,संदीप ढेरंगे ,दिलीप मोरे ,अनिल आदमाने ,मिथुन शिळीमकर ,आबा अडसूळ ,प्रतिक बहुले , यासह उरुळी देवाची ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने चौका चौकात एकत्र येऊन निषेध करीत होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close