ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*आठवडी बाजार सुरु,गार्डन पार्क खुले झाले,शाळा महाविद्यालये बंदच !*

शेअर करा

 

 

बीड दि १४ ऑक्टोबर,प्रतिनिधी

Advertisement

 

हळूहळू टाळेबंदी उठत असून जनजीवन पूर्व पदावर येताना दिसत आहे. केंद्र सरकारने अनलॉक प्रक्रिया सूरु केल्यानंतर आजच्या निर्णयानुसार राज्यात आठवडी बाजार गार्डन पार्क खुले करण्याचा निर्णय जाहीर केला असून बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे सुरु करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार आता दुकाने रात्री ९ वाजेपर्यंत उघडी ठेवण्यास  परवानगी देण्यात आली आहे.हे आदेश १५ ऑक्टोबर पासून लागू होणार आहेत.

सरकारने आज अनलॉकची प्रक्रिया जाहीर केल्यानंतर बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आदेश जारी करून आठवडी बाजार सह इतर गार्डन खुली करण्यास परवानगी दिली आहे.

राज्यात आणि देशात असलेल्या  टाळेबंदी 31 ऑक्टोबर पर्यंत कायम राहणार असून यापूर्वीचे कंटेनमेंट झोन संदर्भातील आदेश कायम असणार आहेत.

हेही वाचा :शिष्यवृत्ती परीक्षेत आष्टी कन्या शाळेच्या १२ विद्यार्थिनी पात्र 

खुली करण्यात आलेल्या घटकांमध्ये गार्डन, पार्क औद्योगिक प्रशिक्षण संस्था,राष्ट्रीय कौशल्य विकास संस्था,अल्प मुदतीच्या प्रशिक्षण संस्था यांना परवानगी देण्यात आली आहे.

शाळा महाविद्यालये,शैक्षणिक संस्था,प्रशिक्षण/शिकवणी देणाऱ्या संस्था 31 ऑक्टोबर पर्यंत बंद राहणार असून ऑनलाईन शिक्षणासाठी ५० टक्के कर्मचार्यांना उपस्थिती साठी सवलत देण्यात आली असून त्यासाठी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेले नियम काटेकोर पणे पाळणे बंधनकारक असणार आहे. कंटेनमेंट झोन च्या बाहेर आठवडी बाजार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: