ताज्या घडामोडीमराठवाडा आणि विदर्भमहाराष्ट्र

*व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या अफवांमुळे बिबट्या कमी पण अफवांचं पेव जास्त*

शेअर करा

आष्टी/पाथर्डी दि 1 प्रतिनिधी

‘इकडे बिबट्या दिसला, तिकडे बिबट्या दिसला , इकडे बिबट्या आला, तिकडे पळाला यासारख्या व्हाट्सअप युनिव्हर्सिटीच्या अफवा मुळे बिबट्या कमी पण अफवांचं पेव जास्त फुटलेलं पहावयास मिळत आहे.पाथर्डी तालुक्यातील बिबट्याच्या संदर्भात सध्या अफवा ना ऊत आलेला दिसत आहे.
‘त्या’ नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी औरंगाबाद नाशिक बीड, जळगाव अहमदनगर या भागातील वनविभागाचे कर्मचारी कामाला लागले आहेत.मात्र ह्या बिबट्यांच्या अफवा कामात अडथळा आणताना दिसत आहेत.अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःचे सरंक्षण करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.

आष्टी आणि पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर बिबट्याने धुमाकूळ घातला असून या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने या भागातील नागरिकांची भीती दूर करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. बिबट्याच्या अफवा ने या भागातील नागरिक भीतीग्रस्त झाले आहेत.

याबाबत माहिती देताना तिसगाव वन परिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुळकर यांनी सांगितले की, करंजी पासून ते शिरसाटवाडी पर्यंतच्या गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये या बिबट्यांचा वावर असून सध्या शेतामध्ये तुरी सारखी मोठ्या उंचीची पिके असल्यामुळे आणि लपण प्रमाण चांगले असल्यामुळे हे बिबटे या भागामध्ये दडून बसलेले आहे. या नरभक्षक बिबट्यांना शोधण्यासाठी नाशिक औरंगाबाद जळगाव या भागातील विशेष पथकांना पाचारण करण्यात आले आहे. सध्या या भागामध्ये 14 पिंजरे बसवण्यात आले असून आणखी सात पिंजऱ्याची भर त्यामध्ये घालण्यात आली आहे. तिसगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत भागामध्ये 17 पिंजरे बसवण्यात आले आहेत तर पाथर्डी वनपरिक्षेत्र अंतर्गत सात पिंजरे आणि गर्भगिरी डोंगराच्या वरच्या बाजूला आष्टी वनपरिक्षेत्र अंतर्गत दोन पिंजरे बसवण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांमध्ये याच डोंगररांगांमध्ये करडवाडी शिवारातील गाढव दरा येथे बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते. शोधण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

हेही वाचा:लघवी test द्वारे कोरोना तपासणी संशोधनाला वेग

वन विभागाने हाती घेतलेल्या या नरभक्षक बिबट्याचा शोध मोहिमेसाठी अत्याधुनिक अशा प्रकारची यंत्रणा आणि मनुष्यबळ  लावण्यात आले आहेत.मात्र व्हॉट्सअप च्या माध्यमातून अफवा पसरविले जात आहे.

आष्टी वन परिक्षेत्र  अधिकारी श्याम शिरसाट यांनी सांगितले की आष्टी वन विभागा अंतर्गत गोखेल सावरगाव मायंबा या भागात लावण्यात आले आहे. सध्या आष्टी विभागाची टीम ही पाथर्डी आणि तिसगाव या वन विभागांना मदत करत असून या भागातील गावांमध्ये जनजागृतीचे काम करत आहे. त्यामध्ये गावात जाऊन नागरिकांनी रात्री घराबाहेर पडू नये, पहाटे बाहेर पडू नये या सारख्या सूचना देण्यात येत आहे तसेच लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवू नये या ही सूचना देत देण्यात येत असल्याचे शिरसाट यांनी सांगितले.

मात्र व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी च्या माध्यमातून विविध फेक बिबट्याची चित्रे आणि त्याबद्दलची अफवा  पसरविण्यात येत आहे.
भगवान गडाच्या पायथ्याशी बिबट्या दिसला, सावरगाव मध्ये बिबट्या आढळला, अमुक ठिकाणी बिबट्या दिसला अशाप्रकारच्या अफवां ना सध्या या भागांमध्ये ऊत आलेला दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आणि व्हॉट्सअप च्या या  अफवां वर विश्वास न ठेवता सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक असल्याचे वनविभाग विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close