ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजमराठवाडा

*मनोरुग्ण वाघाच्या पिंजऱ्याजवळ जातो तेंव्हा…*

अनर्थ टळला

शेअर करा

 

महेश डागा
औरंगाबाद दि 5 जून ,

सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाच्या भिंतीवरून उडी मारत एक मनोरुग्ण चक्क वाघाच्या पिंजऱ्या जवळ शिरल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत उघडकीस आला. वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असून उद्यान कर्मचाऱ्यांनी या मनोरुग्णाला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पिसादेवी रोड वरील श्रीकृष्णनगर येथील हा मनोरुग्ण युवक असून रवींद्र ससाणे अस या युवकाचे नाव आहे. मनोरुग्ण रात्री उद्यानात शिरला होता. सकाळी सात पर्यंत तो वाघ फिरतो त्या जागेवर होता. रात्री वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने अनर्थ टळला असला तरी उद्यान सुरक्षा कुचकामी असल्याच समोर आलं आहे.
मराठवाड्यातील एकमेव असलेल्या औरंगाबादयेथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्यानाच्या मागील बाजूस भिंत मजबूत नसल्याचं समोर आलं आहे. मागील बाजूच्या भिंतीवरून रात्री रवींद्र ससाणे नावाचा मनोरुग्ण घुसला. त्याने भिंतीवरून उडी मारल्यावर तो पिवळ्या वाघाच्या पिंजऱ्यात पडला. ज्या ठिकाणी वाघ मुक्त संचार करतो अश्या ठिकाणी तो पडला. रात्री वाघ पिंजऱ्यात बंदिस्त असल्याने रवींद्र सुरक्षित राहिला. सकाळी सातच्या सुमारास उद्यान कर्मचाऱ्यांच्या निदर्शनात हा प्रकार पडला. त्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती दिली. आणि क्रांतिचौक पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने उद्यानाकडे धाव घेत मनोरुग्ण युवकाला ताब्यात घेतले. या युवकाकडे वडिलांचा मोबाईल क्रमांक असल्याने त्याच्या कुटुंबियांशी संपर्क करणे सोपे झाले. रवींद्र मनोरुग्ण असल्याने त्याला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. लॉक डाऊन असताना आपल्या घरापासून हा मनोरुग्ण सात ते आठ किलोमीटर गेला कसा. युवक उद्यानाची भिंतीवर चढत असताना कोणाचे लक्ष कसे गेले नाही. उद्यानात वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर उद्यानातील सुरक्षा रक्षकांचे रात्रभर लक्ष कसे गेले नाही. असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर तरी आता उद्यान प्रशासन जागे होईल का? हा खरा प्रश्न आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close