ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*चार दिवसांत 16 हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणार का?*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि 19 ,प्रतिनिधी

चार दिवसांत 16 हजार शिक्षकांच्या कोरोना चाचण्या होणार का असा प्रश्न सध्या शिक्षण विभागाला पडला आहे.

9 ते 12 वीच्या शाळा सुरू होण्यास अवघ्या 4 दिवसांचा कालावधी उरला आहे .त्यात शासनाने सर्व शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना RTPCR चाचण्या बंधनकारक केल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील 9 ते 12 वीला शिकविणाऱ्या संपूर्ण शिक्षकांना ही चाचणी करावी लागणार आहे .
याबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी रामदास हाराळ यांनी सांगितले की, “जिल्ह्यात 9 ते 12 वी शिक्षक संख्या ही 16 हजार 706 इतकी udise नुसार आहे. आतापर्यंत 2220 शिक्षकांच्या कोरोना RTPCR चाचण्या केल्या असून उर्वरित शिक्षकांच्या चाचण्या 23 पर्यंत केल्या जाणार आहेत.”

शाळा सुरू होण्यासाठी अवघा *चार दिवसांत चा  कालावधी उरला असून उर्वरित 14 हजार शिक्षकांच्या चाचण्या चार दिवसात कशा होणार हा प्रश्न आहे.
याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांनी सांगितले की,”जिल्ह्यात इतक्या शिक्षकांच्या RTPCR चाचण्या करण्याइतपत किट्स उपलब्ध आहेत.मात्र दररोज 1500 चाचण्या करण्यापर्यंतची क्षमता जिल्हा कोविड लॅब ची आहे.त्यामुळे या संदर्भात जिल्हाधिकारी निर्णय घेतील” असे त्यांनी सांगितले.दररोज 1500 चाचण्या प्रमाणे हिशोब केल्यास चार दिवसात 6000 चाचण्या होऊ शकतात त्यामुळे उर्वरित शिक्षकांचा प्रश्न निर्माण होणार असुन 23 पर्यंत ह्या चाचण्या होणार का यावर प्रश्नचिन्ह आहे.
यावर या चाचण्या खाजगीत करण्याची परवानगी किंवा अँटीजन चाचण्यांना परवानगी दिल्यास हे शक्य आहे अन्यथा बिना चाचण्यांचे शिक्षक शाळेत जाणार का ?*चार दिवसांत चाचण्या होणार का?

 

 

 

 

हेही वाचा : कला आणि कलाकारांवर प्रेम करणारे बाळासाहेब 

शिक्षक आणि  शिक्षकेतर कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने 25 केंद्रावर ही चाचण्या घेतल्या जात आहेत.9 वी ते 12वी च्या वर्गाला शिकविणाऱ्या शिक्षकांचा समावेश आहे .आतापर्यंत 2220 शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून 1209 शाळा महाविद्यालयाला याचा फायदा होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close