fbpx
ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*दिवाळी तुमची दवाखान्यात जाणार काय?आज जिल्ह्यात 200 कोरोना ग्रस्तांची भर*

*आज २३६ रुग्णांना डिस्चार्ज तर २०० बाधितांची रुग्णसंख्येत भर*

शेअर करा

 

 

अहमदनगर दि 13 ,प्रतिनिधी

Advertisement

दिवाळी तुमची जर रुग्णालयात जाणार असेल तर तुम्हाला कसे वाटेल? दिवाळी सुरू झाली म्हणजे कोरोना थांबला असे नाही.आज अहमदनगर जिल्ह्यातील चक्क 200 व्यक्ती कोरोना बाधित झाले आहेत.

जिल्ह्यात आज २३६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ८३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३५९ इतकी झाली आहे.

दिवाळीच्या निमित्ताने अनेक नागरिक घराबाहेर पडत आहेत.ते कुठलीही काळजी घेताना दिसत नाही .त्यामुळे तुम्ही काळजी घ्या.तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४५, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ४० आणि अँटीजेन चाचणीत ११५ रुग्ण बाधीत आढळले.

हेही वाचा:कोरोनाला सहज घेऊ नका

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०८,अकोले १९, जामखेड ०१, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०६, पारनेर ०१, पाथर्डी ०३, संगमनेर ०१, शेवगाव ०३, श्रीगोंदा ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १३, अकोले ०२,जामखेड ०१, नगर ग्रामीण ०६, नेवासा ०२ पाथर्डी ०१, राहाता ०३, राहुरी ०५, संगमनेर ०५, श्रीगोंदा ०१, श्रीरामपूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ११५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा ०८, अकोले ३३, जामखेड ०८, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण ०५, नेवासा ०१, पारनेर ०१, पाथर्डी २१, राहता ०९, संगमनेर ०७, शेवगाव ०६, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा ४२, अकोले १३, जामखेड ०९, कर्जत ११, कोपरगाव ०३, नगर ग्रा.१४, नेवासा २८, पारनेर ०४,,पाथर्डी २३, राहाता १३, राहुरी ०८, संगमनेर ३०, शेवगाव १५, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०५ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:५६८३६*

*उपचार सुरू असलेले रूग्ण: १३५९*

*मृत्यू:८९७*

*एकूण रूग्ण संख्या:५९०९५*

 

Advertisement

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close