आठरे पाटील पब्लिक स्कुल मध्ये प्रजासत्ताक दिनी संचलनात अश्वारूढ पथकाने दिली मानवंदना

अहमदनगर (प्रतिनिधी) :

  येथील चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्ट संचालित आठरे पाटील पब्लिक स्कुल मध्ये ७१ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला . भारताच्या तिरंगा ध्वजाला आणि प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देताना काढण्यात आलेल्या संचलनात अश्वारूढ विद्यार्थी विद्यार्थिनींचे पथक सहभागी झाले होते . १० अश्वारूढ  मुलांनी  यावेळी अश्वारोहणाची आकर्षक साहसी प्रात्येक्षिके  सादर करून उपस्थितांची मने जिंकली .  दरवषी विद्यालयात राष्ट्रीय सन समारंभ साजरे करताना अशाच प्रकारे संचलनात अश्वांचा सहभाग असतो .  मुंबई येथील सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ डॉ . विजय पाणीकर यांच्या हस्ते शाळेत ध्वजारोहण समारंभ पार पडला . त्यांनतर ध्वजाला मानवंदना देण्यासाठी विद्यालयातील एन.  सी. सी. पथक तसेच सर्व हाऊसच्या पथकांनी संचलनात सहभाग घेतला होता .  यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ . अनिल आठरे पाटील , मुख्य कार्यकारी अधिकारी संजय आठरे पाटील , रमण मारो , रणजित सावंत , निरुपमा सावंत ,  जनाबाई आठरे , डॉ . अंजलीताई आठरे , मंजुषा आठरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . ध्वजारोहण समारंभानंतर उपस्थित विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि पाहुण्यांनी  भारतीय संविधानाचे सामुदायिक वाचन केले . यावेळी बोलताना डॉ . विजय पाणीकर म्हंणाले की , आज स्वच्छ भारत अभियान , प्लॅस्टिक मुक्त भारत  आदी अभियानाचा बोलबाला आहे पण आज  यासोबत देशाला सुदृढ भारत अभियान राबविण्याची गरज आहे. आजचे विद्यार्थी व तरुण पिढी मोबाईल मध्ये अडकलेली आहे. जंक फूड , फास्ट फूड च्या आहारी गेली आहेत . त्यामुळे भारत देश हा मधुमेही रुग्णाचा देश बनत चालला आहे . त्यामुळे देशवासीयांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे . आठरे पाटील पब्लिक स्कुल मध्ये अश्वारोहण , जलतरण आदींचे प्रशिक्षण दिले जाते . विविध क्रीडा प्रकार शिकवले जातात त्यामुळे या शाळेतील मुले हुशार आणि सुदृढ बनतात . अभ्यासाबरोबरच मुलाना क्रीडागणाची आवड निर्माण केल्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व सर्वगुण संपन्न बनते .      यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अनिल आठरे , डॉ . अंजली आठरे व प्राचार्य कर्नल डी . ए पाटील  यांनी केले . प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.  नंतर विद्यार्थ्यांनी  शाळेच्या बँड पथकाच्या तालावर देशभक्तीपर गीते सादर  केली .  यावेळी  अहमदाबाद येथे झालेल्या राष्ट्रीय एरियल सिल्क  स्पर्धेत रजत पदके मिळविणाऱ्या  ऋचा जाधव हीचा  सत्कार करण्यात आला . राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली . 

Share this story