*राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग समिती सदस्यांची जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा*

 

शिर्डी दि 27 फेब्रुवारी । टीम सीएमन्यूज

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, भारत सरकारअंतर्गत अध्यक्ष प्रो.राम शंकर कथेरिया यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिर्डी येथे पार पडलेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली व अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. उपाध्यक्ष डॉ.एल.मुरुगन, समिती सदस्य डॉ.योगेंद्र पासवान, डॉ.श्रीमती स्वराज विद्वान, डॉ.के.रामलू, आयोगाचे संचालक एस.के.सिंग, श्रीमती अनुराधा दुसाने यावेळी उपस्थित होते. समिती दोन दिवसीय शिर्डी दौऱ्यावर आली होती.

अनुसूचित जातीच्या नागरीकांचे हक्क अबाधित ठेवतानाच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची त्वरित दखल घेण्याचे निर्देश समितीने जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना या बैठकीत दिले. अन्याय व अत्याचारग्रस्तांना कायद्यानुसार आवश्यक असलेली मदत विनाविलंब द्यावी तसेच अशा प्रकरणी प्रशासनाने संवेदनशील असावे, अशी सूचना समिती अध्यक्ष प्रो.राम शंकर कथेरिया यांनी अधिकाऱ्यांना केली. बैठकीत जिल्हयातील विविध प्रकरणांचा समितीने आढावा घेतला.

बैठकीला अपर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे, पोलीस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एम.मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, सहायक आयुक्त पांडुरंग वाबळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, दिलीप थोरे, नगर पंचायत मुख्याधिकारी सतीश दिघे उपस्थित होते.

Share this story