*भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन*
*भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन*

 

अहमदनगर दि 24 जून टीमसीएम न्यूज

लॉकडाऊन काळातील जादा वीजबील आकारणी रद्द करून वीजबिलं माफ करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कौन्सिलच्या वतीने अहमदनगर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी ऍड. कॉ. सुभाष पाटील लांडे म्हणाले की, महावितरणने चालू महिन्यात कोरोना लॉकडाऊन काळातील रिडींग न घेता तीन महिन्याचे सरसकट सरासरी वाढीव रकमेची वीजबीले ग्राहकांना पाठवली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य वीजग्राहक हवालदिल झाला असून खुप मोठी तफावत असलेल्या जादा रकमेची वीजबीलं ते भरू शकत नाहीत.
अधीक्षक अभियंता, मुख्यमंत्री आणि राज्य उर्जामंत्र्यांना पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कोरोना काळात लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेलेले आहेत. नोक-या गमावल्या आहेत. मुलांच्या शिक्षणासह दैनंदिन खर्च भागवणेे दूरापास्त झाले आहे. अज्ञात दुप्पट, तिप्पट रकमेची वीजबीले आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढीव बीलाबाबत तक्रारींची दखल घेतली जात नाही. या बाबत महावितरण कंपनीने खुलासा केला कि, याच काळात वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. ग्राहकांना रिडींग न घेता दिलेली बीले अन्यायकारक असून वीज ग्राहकांची फसवणूक आहे. कोरोनासारखे जागतीक महासंकट असताना या काळात विज दरवाढ करणे म्हणजे शुध्द लुबाडणूक असून भारतीय कम्युनिस्ट पक्ष या धोकाधडीचा जाहीर निषेध करत आहे. हि दरवाढ भारतीय कम्युनिस्ट पक्षासह वीज ग्राहकांना मान्य नाही. त्यामुळे महावितरणने दिलेली जादा रकमेची आवास्तव, अवाजवी वीजबीले मागे घेऊन सरकारने लॉकडाऊन काळातील वीजबीले माफ करावीत. अशी मागणी तसेच या काळात केलेली वीज दरवाढ रद्द करावी. अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली.
या आंदोलनात कॉ. भैरवनाथ वाकळे, ऍड कॉ. सुधीर टोकेकर, ऍड कॉ. शांताराम वाळुंज आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वीजबिल दरवाढीविरोधात घोषणा दिल्या.

Share this story