*कोरोनाने जिल्हा व्यापला;गावागावात कोरोना,176 रुग्ण*
*कोरोनाने जिल्हा व्यापला;गावागावात कोरोना,176 रुग्ण*

 

बीड दि 5 प्रतिनिधी

बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 176 रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील 46 आहेत.आष्टीतील 19 बधितांचा समावेश आहे.आजच्या आलेल्या अहवालावरून कोरोना गावागावात पोहचला असल्याचे चित्र दिसत आहे.

आज बीड जिल्ह्यातील 1024 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 848 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 176 बाधित आढळून आले आहेत.परळी 23 बीड 46,अंबाजोगाई 16,केज 11,माजलगाव 04, धारूर 16 ,पाटोदा 06 आष्टी 19,शिरूर 11,वडवणी 14,गेवराई 10 जणांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यातील अकरा तालुके पूर्णपणे कोरोना ने व्यापले असून आजच्या अहवालानुसार गावागावात कोरोना आढळून आल्याचे चित्र आहे.गेल्या दोन दिवसांपासून बिनधास्त पणे नागरिकांचा वावर वाढला आहे.बीड जिल्ह्यात कोरोना नसल्यासारखे नागरिक वावरताना दिसत आहेत.या यादीवर नजर मारल्यास जिल्ह्यातील छोट्या गावांमध्ये वाडी वस्त्यांवर कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा:अहमदनगर:जिल्ह्यात ८६७ नवे रुग्ण’चेस दी व्हायरसचा परिणाम

 

Share this story