*पुण्यातील जुना बाजार येथील विक्रेत्यांना मदत मिळण्याची मागणी*
*पुण्यातील जुना बाजार येथील विक्रेत्यांना मदत मिळण्याची मागणी*

 

शेखर गौड
पुणे दि 12 जून

पुण्यातील जुना बाजार येथील विक्रेत्यांना मदत मिळण्याची मागणी लोकहित प्रतिष्ठानने केली आहे.यासंदर्भात त्यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना मागणी केली आहे .

पुणे शहरातील मंगळवार पेठ येथे गेली शेकडो वर्षांपासून जुन्या वस्तू खरेदी – विक्री करण्याचा “जुना बाजार” दर आठवड्याच्या बुधवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात भरत असतो.
अनेक गरीब विक्रेते आठवड्यातील दोन दिवसांच्या विक्रीतून आलेल्या तुटपुंज्या उत्पन्नावर आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यातही भटक्या विमुक्त समाजातील महिला विक्रेत्यांची संख्या लक्षणीय आहे.

हेही वाचा आणि स्कॉर्पिओ गाडीसह तिघे विहिरीत कोसळले!

परंतु गेल्या ३ महिन्यांपासून कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने सदर जुना बाजार बंद ठेवला असल्याने येथे जुन्या वस्तूंची / कपड्यांची विक्री करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या शेकडो कुटुंबांवर अत्यंत मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. तसेच यापुढील काळात देखील सदर जुना बाजार किती प्रमाणात भरेल याची चिंता या सर्व गरीब विक्रेत्यांना सतावते आहे.

तरी, येथील सर्व विक्रेत्यांना २५ मार्च पासून ते सदर बाजार पुन्हा त्याच्या पूर्वीच्या क्षमतेने भरेपर्यंतच्या काळासाठी दरमहा रु. १०,०००/-
उदरनिर्वाह भत्ता तसेच रेशन किट उपलब्ध करून दिल्यास त्यांना उदर्निर्वाहास दिलासा मिळेल. या गरीब व्यावसायिकांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी लोकहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जोशी यांनी एका निवेदनाद्वारे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Share this story