2020 च्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा

अहमदनगर-प्रतिनिधी 

2020 च्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विविध साहित्य पुरस्कारांची आज करण्यात आली.साहित्य सेवा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यीक व समिक्षक डॉ.तारा भवाळकर यांना तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार- मुंबई येथील गणेश चंदनशिवे यांना जाहीर.झाला.यासंदर्भातील घोषणा निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी केली.याच बरोबर विविध पुरस्कार घोषित करण्यात आले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीदिनाच्या निमित्ताने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. यंदाचे हे पुरस्काराचे ३१ वे वर्ष आहे.

साहित्‍य पुरस्‍कारांचे वितरण हे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनी म्‍हणजे नारळी पौर्णिमेच्‍या निमित्‍ताने दरवर्षी प्रवरानगर येथे संपन्‍न होत असते. या कार्यक्रमास जिल्‍ह्यासह राज्‍यातून मान्‍यवर साहित्‍यीक आणि निमंत्रित उपस्थित राहत असतात. परंतू नगर जिल्‍ह्यात कोव्‍हीड सं‍कटाच्‍या पार्श्‍वभूमिवर अद्यापही प्रशासनाची सांस्‍कृतीक कार्यक्रमांवर बंधनं आहेत. त्‍यामुळे साहित्‍य पुरस्‍कार वितरण सोहळा कोव्‍हीडचे निर्बंध शिथील झाल्‍यानंतर संपन्‍न होणार असून, या कार्यक्रमात दोन्‍हीही वर्षांचे साहित्‍य  पुरस्‍कार वितरीत केले जाणार असल्‍याची माहीती आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.
डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार श्री.दिनकर मनवर (वाशीम)

राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार- सुरेश पाटील (कोल्‍हापूर)

अहमदनगर जिल्हा उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार प्रा.अशोक लिंबेकर (संगमनेर)

अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार डॉ.सोमनाथ मुटकूळे (संगमनेर)

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील समाजप्रबोधन पुरस्कार श्री.विनोद शिरसाठ, पाथर्डी

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील नाट्यसेवा पुरस्कार- धर्मकिर्ती सुमंत ,पुणे

अहमदनगर जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार अशोक महाराज निर्मळ यांना जाहीर

Share this story