*पाथर्डी नगरपालिकेचे दोन कर्मचाऱ्यासह २० जण कोरोना पॉझिटिव्ह*
*पाथर्डी नगरपालिकेचे दोन कर्मचाऱ्यासह २० जण कोरोना पॉझिटिव्ह*

 

 

पाथर्डी , दि. १७ जुलै टीम सीएम न्यूज

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पाय पसरत आहे. जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याच्या नंतर पाथर्डी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येते आहेत. पाथर्डी पालिकेतील वसुली पथकातील आज दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.त्याच बरोबर वसुली पथकातील पॉझिटिव्ह असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या मुलाला देखील कोरोनाची बाधा झाली आहे. दिवसभरात २२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

पाथर्डी शहरातील विविध भागांतील २० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे;तर तालुक्यातील तीनखडी व वाळुंज येथील प्रत्येकी एका जणाला बाधा झाली आहे.त्यामुळे एकूण सायंकाळची संख्या ही २२ वर पोहीचली आहे.सकाळी देखील १ जण पॉझिटिव्ह मिळाला होता.याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी दिली.

तालुक्यातील जिल्हा उपकेंद्रामध्ये अँटी रॅपिड किटचा वापर केला जात असल्याने स्वब घेतलेल्या व्यक्तींचे अहवाल तात्काळ मिळत असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण शोधण्यास मदत होत आहे त्यामुळे प्रशासनाला उपाययोजना करण्यास मदत होत आहे.

 *तालुक्यात तीन दिवसात 85 रुग्ण तर आज नव्याने  22 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह*

गेल्या तीन दिवसापासून  तालुक्यात 85 रुग्ण कोरोना विषाणूने बाधित आढळून आहे आहेत. त्यामध्ये पाथर्डी नगरपालिकेचे तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्यांच्या कुटुंबियांना याचा संसर्ग झाला आहे. याच बरोबर तालुक्यातील तिसगाव, आगासखांड, कोल्हार कोल्हुबाई,त्रिभुवनवाडी येथे बाधित आढळून आलेले आहेत. तालुक्यातील तिसगाव , करंजी आणि पाथर्डी शहर बंद आहेत.

*अहमदनगर जिल्ह्यात वाढती कोरोना संख्या;दिवसभरात ११७ बाधितांची नोंद*

Share this story