ताज्या घडामोडीप.महाराष्ट्रब्रेकिंग न्यूज

*नगर शहरासह जिल्ह्यात 14 कोरोना बाधित कालचे रेकॉर्ड आज मोडले@131*

शेअर करा

 

अहमदनगर दि 30 मे टीम सीएमन्यूज

अहमदनगर जिल्ह्यातील आणि जिल्हा बाहेरील कोरोना बाधित   व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज दिवसभरात १४ नवीन व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह त्यामुळे जिल्ह्यात चिंता वाढली आहे. संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे. सकाळी नगर शहरातील 5 आणि संगमनेर मधील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला सायंकाळी ही संख्या वाढून आणखी 7 व्यक्तीची भर पडून दिवसभरात 14 बाधित आढळून आले .त्यामुळे एकूण बधितांचा आकडा 131 इतका झाला आहे .
नगर शहरातील सथ्था कॉलनीतील एका कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधित आढळून आले . यामध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे . याच कुटुंबातील एक महिला पुणे येथे कोरोना बाधीत आहे . जिल्ह्यातील संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे .

सायंकाळी आलेल्या अहवालात
राशीन (कर्जत) येथील ७० वर्षीय पुरुष आणि १४ वर्षीय मुलगी बाधीत आढळून आले.हे काल बाधित आलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.
संगमनेर येथील एकाच कुटुंबातील १३ आणि १७ वर्षीय मुले बाधित झाले आहेत हेही काल आढळून आलेल्या बाधित रुग्णाचे नातेवाईक आहेत . शिर्डी येथील ५५ वर्ष वयाची महिला बाधित आढळून आली असून ती निमगाव येथील बाधित महिलेच्या संपर्कात आली होती.
घाटकोपर येथून धामणगाव पाट (अकोले) येथे आलेला ४९ वर्षीय व्यक्ती बाधित आढळून आला आहे .तर भांडुप येथून कारेगाव (नेवासा) येथे आलेला ३५ वर्षीय युवक बाधित सापडला आहे .

हेही वाचा : कोरोनाच्या भविष्यातील प्रसाराच्या अटकावाकरिता कोविड संशोधन केंद्र उपयुक्त*पालकमंत्री सुभाष देसाई

जिल्ह्यातील ०६ रुग्ण कोरोनामुक्त

अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन परतले घरी.नगर शहरातील ०३ पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार घेत असलेला रुग्णही बरा. जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ६८ इतकी झाली आहे.

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: