देशविदेशमनोरंजन
Trending

*हा आवाज तुम्ही रोज ऐकता..कोण आहे जसलीन भल्ला*

शेअर करा

 

 

 

 

मनोज सातपुते

टीम सीएमन्यूज
“कोरोना व्हायरस या कोविड 19 से पुरा देश लढ रहा है,पर याद रहे हमे बिमारी से लढना है,बिमार से नही…….”
नंबर डायल केला की,आपल्याला ही कॉलर ट्यून ऐकायला मिळते.तब्बल तीस सेकंद ही ट्यून ऐकल्यावर आपला फोन सुरू होतो .
देशातल्या सव्वाशे करोड लोकांना कोरोना च्या महामारीत ही कॉलर ट्यून ऐकावी लागत आहे .तशी ती ट्यून छान असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्याचा आनंद ही घेतो. कोण आहे ही महिला का कोणी रोबोट आहे असा प्रश्न सर्वांना पडतो.हा कोणी रोबोट नसून ह्या आहेत जसलीन भल्ला.
सध्या सर्वांना या महिलेने जबरदस्तीने कोरोना वर मात करण्यासाठी ऐकायला भाग पाडले आहे.

Advertisement

व्हाईस ओव्हर आर्टिस्ट असलेल्या जसलीन यांचा आवाज कोरोना ला मिळाला आणि त्या देशातील करोडो लोकांच्या कानापर्यंत पोहचला. सुरुवातीला लोकांनी आवाज ऐकून माहिती समजून घेतली आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली . आता लोक या आवाजाचा शोध घेत आहेत. गुगल वर जसलीन भल्ला सर्च केलं की माहिती समोर येते.
स्पोर्ट जर्नालिस्ट असलेल्या जसलीन 10 वर्षांपूर्वी आवाजाच्या दुनियेकडे वळाल्या. इंडियन रेल्वे, विमान कंपन्या मोबाईल कंपन्या यांना आवाज दिल्यानंतर त्यांचा आवाज सर्वश्रुत झाला .याबाबत जसलीन ने ऐका सोशल मीडिया वर मुलाखतीत सांगितले की, मला सुरुवातीला वाटले नव्हते की,माझा आवाज कोरोना साठी वापरलं जाईल, मला नेहमी प्रमाणे आरोग्य मंत्रालयाने सॅम्पल ऑडिओ साठी बोलाविले होते ,मी ऑडिओ दिल्यानंतर मला वाटले की , हा सहज जसा एखाद्या स्पॉट साठी वापरतात तसा इतरत्र तसा वापरला जाईल, पण जेव्हा मी माझ्या फोन वर माझा आवाज ऐकल्यावर मला आश्चर्य वाटले,जेंव्हा मी घराबाहेर पडते तेव्हा लोकांच्या फोन वर कॉलर ट्यून ऐकायला मिळते. लोकही ऐकतात.”
जसलीन ने आपला एक अनुभव शेअर केला ती म्हणते की,”माझे पती इंडिगो विमानात प्रवास करत असताना विमानातील सूचना ऐकल्यावर त्यांनी एअर होस्टेस ला विचारले की हा कोणाचा आवाज आहे? त्यावर एअर होस्टेस ने रोबोटचा असे उत्तर दिले ते ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं, त्यांनी तिला सांगितले की हा माझ्या पत्नीचा आवाज आहे त्यावर तिचा विश्वास बसला नाही”हे जसलीन ने आवर्जून सांगितले.

जो कोई नही सिखा पाये वो जसलीन ने सिखाया

लॉकडाउनच्या काळात जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सर्वांना जसलीनचा आवाज ऐकायला मिळाला.आणि लोकांनी या आवाजाचे अनुकरणही केले.कोरोना च्या महामारीत अनेक भाषेत आवाज रूपांतरित करण्यात आला. एका 30 सेंकंदाच्या आवाजातील संदेशाने जसलीन आवाजाच्या दुनियेत प्रसिद्ध पावली.

Photo courtesy: instagram_jasleen_bhalla

Advertisement
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!
Close
Close
%d bloggers like this: