क्राईमताज्या घडामोडी

*पत्नीच्या पेटत्या चितेनंतर विहिरीत मारली उडी*

पत्नीच्या विरह सहन न झाल्याने आत्महत्या

शेअर करा

 

गडचिरोली दि 22 जून टीमसीएम न्यूज

पत्नीवर अंत्यसंस्कार सुरू असतांना अचानक जळत्या चितेवर पती ने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाल्याने नजीकच्या विहिरीत उडी मारून त्यानं स्वतः ला संपवले. गडचिरोली जिल्ह्यातील भंगाराम तळोधीत ही घटना घडली .

लाँकडाऊन सुरू होण्यापूर्वी पाच दिवस आधी रुचिता आणि किशोर यांचा विवाह 19 मार्च झाला होता.रुचिता ही तीन महिन्याची गर्भवती होती.माहेरी आल्यानंतर घरातून बाहेर पडलेल्या रुचिताचा विहिरीत मृतदेह आढळून आला .तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असताना तिचा पती किशोर खाटीक यांनी जळत्या चितेत उडी घेतली.यावेळी उपस्थित जमावाने किशोरला चितेबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावाला न जुमानता त्याने चितेलगतच्या विहिरीत उडी घेतली.त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.नवविवाहित गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने देखिल स्वतःला संपविल्याची खळबळजनक घटना भंगाराम तळोधीत घडली.
गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रूचीता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला.ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती.चार दिवसापुर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे माहेरी आली.रविवारी सायंकाळच्या सुमारास ती शौचास बाहेर पडली.पण बराच वेळपर्यत घरी परतलीच नाही.यामूळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली.दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ तिची चप्पल आढळून आली.यामूळे शंकेची पाल चुकचुकली.पोलिसांना माहिती देण्यात आली.त्याने शोधाशोध केली.त्यावेळी विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला.यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला.लाँकडाऊनच्या अगदी पुर्वीच तिचा विवाह झाला होता.ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असतांना आज(सोमवारी) तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होता.अचानक पेटत्या चितेवर पती किशोरने उडी घेतली.यावेळी जमावाने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांना न जुमानता स्वतःला संपविण्याच्या प्रयत्नात लगतच्या विहिरीत किशोरने उडी मारली.यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केली.त्याला वाचविण्याचा प्रयत्नही झाला.मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले.आणि पत्नी रुचितासोबत पती किशोरने जगाचा निरोप घेतला.मन हेलवणाऱ्या या घननेनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close