Wednesday, October 16, 2024

मध्य रेल्वेचे रेस्टॉरंट ऑन व्हील्स –दादर दरबार ही अभिनव संकल्पना

Mumbai

Central Railway’s Restaurant on Wheels – Dadar Darbar is an innovative concept रेस्टॉरंट ऑन व्हील्स – खानपान धोरणाच्या नाविन्यपूर्ण कल्पनांच्या अंतर्गत जुन्या कोडल लाइफ संपलेल्या रेल्वे डब्यांना रेस्टॉरंटमध्ये बदललण्याची ही संकल्पना सुरू करणारी मध्य रेल्वेच आहे. रेल्वे-थीम असलेल्या सेटिंगमध्ये जेवणाचा एक अनोखा अनुभव असल्याने हे खूप लोकप्रिय असल्याचे सिद्ध झाले आहे.

बँड वॅगनमध्ये सामील होणारे नवीनतम रेस्टॉरंट ऑन व्हील्स हे “दादर दरबार” आहे जे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकावर उघडण्यात आले आहे.
हे एक अनोखे आणि संस्मरणीय जेवणाचा अनुभव देणारे उत्तम जेवणाचे ठिकाण आहे.
“दादर दरबार” ७२ जागांना सामावून घेण्याइतके प्रशस्त आहे आणि मध्य रेल्वेवर जास्त क्षमतेचे रेस्टॉरंट ऑन व्हील्स आहे.
त्याच्या नावाप्रमाणेच, “दादर दरबार” च्या आतील भागात एक प्रासादिक वातावरण आहे आणि ते स्पर्धात्मक दरात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे एक महत्त्वाचे उपहारगृह बनले आहे.

मुंबई विभागाचा एक उपक्रम, “दादर दरबार” मेसर्स युनिक एंटरप्रायझेसला 5 वर्षांच्या कालावधीसाठी वार्षिक रु.५८.११ लाख परवाना शुल्कासह ई-लिलावाद्वारे वाटप करण्यात आला. स्वयंपाकघरासाठी दिलेल्या अतिरिक्त जागेतून मध्य रेल्वेला दरवर्षी रु. १५.५९ लाख मिळतील. सेवेतून काढून टाकलेला रेल्वे डबा परवानाधारकाने मुंबईतील एका प्रसिद्ध वास्तुविशारदाकडून डिझाइन केलेल्या अप्रतिम रेस्टॉरंटमध्ये बदलला आहे.

असेच रेस्टॉरंट ऑन व्हील्स सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस, पुणे, अमरावती आणि अकोला येथे कार्यरत आहेत.

हे रेस्टॉरंट ऑन व्हील्स थीम हे प्रवासी-अनुकूल उपक्रमांचे उत्कृष्ट उदाहरण असून या महसूल निर्मितीच्या नवीन कल्पना आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles