Tuesday, July 23, 2024
spot_img

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

Cheer4Bharat hashtag for Paris Olympics पॅरिस ऑलिम्पिकसाठी देश सज्ज होत असताना पंतप्रधानांनी #Cheer4Bharat हॅशटॅग केला सादर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातील त्यांच्या भाषणात आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या चमूला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.  टोकियोमधील प्रशंसनीय कामगिरीनंतर खेळाडूंचे समर्पण आणि तयारी लक्षात घेत भारतीय क्रीडापटूंच्या पुन्हा एकदा जागतिक मंचावर चमकण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी विश्वास दर्शवला.

“टोकियो ऑलिम्पिकनंतर लगेचच आपले खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीत मनापासून गुंतले होते.  एकंदरीत सर्व खेळाडूंचा विचार केला तर या सर्वांनी जवळपास नऊशे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.  हा खूप मोठा आकडा आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

पहिल्यांदाच घडणाऱ्या काही गोष्टींबद्दल देशाला माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, “शूटिंगमध्ये आपल्या खेळाडूंची प्रतिभा जगासमोर येत आहे.  पुरुष आणि महिला दोन्ही संघ टेबल टेनिसमध्ये पात्र ठरले आहेत.  आपल्या नेमबाजी स्पर्धेतील मुलीही भारतीय शॉटगन संघाचा भाग आहेत.  यावेळी, आपल्या चमूचे सदस्य यापूर्वी कधीही भाग घेतला नव्हता असे क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती आणि घोडेस्वारीमध्ये देखील स्पर्धेत उतरणार आहेत.  यावरून, आपल्या क्रीडा विश्वात वेगळ्या स्तरावरचा उत्साह दिसत असल्याचे लक्षात येत, असे पंतप्रधान म्हणाले.

भारताच्या पूर्वीच्या कामगिरीचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी आपल्या खेळाडूंनी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली होती.  आपल्या खेळाडूंनी बुद्धिबळ आणि बॅडमिंटनमध्येही गौरवशाली कामगिरी केली आहे.”

भारतीय खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करतील अशी देशाची सामूहिक आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आणि प्रत्येक भारतीयाने #Cheer4Bharat हॅशटॅग वापरून खेळाडूंना समर्थन देण्याचे आवाहन केले.

येत्या काही दिवसांत पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय चमूची भेट घेऊन त्यांना संपूर्ण देशाच्या वतीने प्रोत्साहन देणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles