NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; एक आरोपी अटकेत

नाशिक

nashik neet ug paper leak case one detained: NEET परीक्षा पेपरफुटी प्रकरणात राजस्थान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात महाराष्ट्रातून आतापर्यंत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातून ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे वय सुमारे ३० वर्षे असून तो कुटुंबासह इंदिरानगर परिसरात वास्तव्यास होता. दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास तो दर्शनासाठी जात असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. संबंधित आरोपी हा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील रहिवासी असून तो BAMS चे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

ही संपूर्ण कारवाई नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने केली. तपासाच्या सुरुवातीला पोलिसांकडे केवळ आरोपीचे नाव उपलब्ध होते. त्यानंतर तांत्रिक माहिती आणि डिजिटल इनपुटच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा फोटो मिळवून शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आरोपीने आपला हुलिया बदलला होता तसेच केसही कापले होते. मात्र, एका पोलिस अधिकाऱ्याने जुन्या फोटोच्या आधारे चेहरा ओळखत आरोपीची खात्री केली आणि त्याला अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात आरोपीने नाशिकमध्ये कोणतेही पेपर किंवा दस्तऐवज छापले नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या राजस्थान पोलिस आणि इतर तपास यंत्रणांकडून संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा सखोल तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles