लोकसंवाद 2026 ग्रामीण भागात शासकीय योजनांच्या माहिती आणि संवादासाठी प्रभावी उपक्रम -पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

 

शिर्डी

ग्रामीण भागात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती लोकसंवाद 2026 अंतर्गत गणेश उत्सवाच्या माध्यमातून दिली जात आहे.गणेश मंडळ आणि प्रशासन यांच्या सहकार्याने “लोकसंवाद 2026” कार्यक्रमात सहभाग घेऊन जास्तीत जास्त गरजू ,लाभार्थी घटकापर्यंत योजनांची माहिती प्रभावी संवाद माध्यमातून पोहोचवावी असे आवाहन पालकमंत्री डॉ .राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

उप माहिती कार्यालय शिर्डी आणि संगमनेर तालुक्यातील समनापुर येथील श्री गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद 2026 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार अमोल खताळ, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे उपअभियंता संजय टेकाळे. संगमनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर, समनापुर येथील श्री गणेश मंदिर ट्रस्टचे डॉ. प्रदीप कुटे पदाधिकारी संजय कुटे, शिवाजी कुटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध अद्यावत एलईडी व्हॅनचा वापर करण्यात यावा. जेणेकरून कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकापर्यंत शासनाच्या विविध विभागाची भूमिका आणि योजनाची माहिती पोहचण्यास मदत होईल,असे पालकमंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.
कार्यकमा पूर्वी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते श्री गणेश मंदिरातील गणेशाची आरती संपन्न झाली.

‘लोकसंवाद-2026’ उपक्रमा अंतर्गत गणेश उत्सवातील विविध गणेश मंडळाचे नाविन्यपूर्ण उपक्रम, देखावे, लोकपरंपरा, पर्यावरण पूरक लोकोत्सव याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी व महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा डिजिटल स्वरूपात जतन व्हावा यासाठी नागरिकांनी विविध गणेश मंडळाअंतर्गत अनोख्या उपक्रमांच्या परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या माहितीचे, फोटो, संकलन करून Baapa. org या संकेतस्थळावर अपलोड करावे असे आवाहन माहिती अधिकारी डॉ .मीरा ढास यांनी केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles