एसआयटीच्या पथकाकडून खा. सोनवणेंच्या घराची तपासणी

केज,

Kej vilas ghule murder case विलास घुले खून प्रकरणात फिर्यादी रमेश घुले यांच्या पुरवणी जबाबात खा. बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांचे नाव आल्या नंतर घुले प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने गठित करण्यात आलेले एसआयटी पथकाचे आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांनी काल केज येथे खा. बजरंग सोनवणे यांच्या निवास्थानी जाऊन तपास केला आहे. यावेळी त्यांच्या बंगल्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने पोटात वार केल्याने दि. २१ जून रोजी विलास घुले यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात नऊ आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

त्यातील सर्वआरोपी पोलिसांनी अटक केली आहे. त्या सर्वआरोपींना ३० जून पर्यंत पोलिस कोरडी सुनावण्यात आलेली आहे.

दरम्यान मयत विलास घुले यांचे भाऊआणि या घटनेतील फिर्यादी रमेश घुले यांनी दि. २३ जून रोजी दिलेल्या पुरवणी जबाबात बीड जिल्ह्याचे खा. बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचाही या प्रकरणाशी सबंध असल्याचा पुरवणी जबाब दिल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

तसेच विलास घुले खून प्रकरणाची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने एसआयटी गठित करण्यात आली आहे.


त्या एसआयटी पथकाचे प्रमुख आयपीएस अधिकारी व्यंकट राम यांनी दि. २६ जून रोजी दुपारी केज येथील पवनसुत निवासस्थानी जाऊन तपासणी केली.
यावेळी पवनसुत बंगल्यातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात आल्याचे सांगितले जात आहे. जवळपास दिड ते दोन तास हे पथक याठिकाणी तळ ठोकून होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles