Homeक्राईम बातमीMaha tet exam postponed due to leakage पेपर फुटला; उद्या होणारी TET...

Maha tet exam postponed due to leakage पेपर फुटला; उद्या होणारी TET परीक्षा रद्द

भिवंडी,

Maha tet exam postponed due to leakage महाराष्ट्रात पुन्हा एकदा परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांच्या ताब्यातून TET (शिक्षक पात्रता परीक्षा) ची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

प्राथमिक तपासात जप्त करण्यात आलेली प्रश्नपत्रिका मूळ परीक्षेच्या पेपरशी मिळतीजुळती असल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून उद्या होणारी TET परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या घटनेमुळे राज्यातील लाखो परीक्षार्थ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस आणि शिक्षण विभागाकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पेपरफुटीचे जाळे किती मोठे आहे आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान परीक्षा परिषदेने निवेदन दिले आहे की, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत दि.२८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ घेण्याचे प्रस्तावित होते. NEET २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना केलेल्या होत्या.

तथापि, आज दि. २७ जून, २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास गोपनिय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेब‌द्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलीस यांनी सदर ठिकाणी धाड घातली. यानंतर तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ परिक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

सदर परिस्थिती लक्षात घेता दि.२८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुढे ढकलण्यात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.

शिक्षक पात्रता (TET) परिक्षेबाबत अ‌द्यावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments