शालेय जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत श्री शारदा शाळेला उपविजेतेपद.
कोपरगाव (गौरव डेंगळे )
Ahmednagar district level table tennis under 14 येथील सोमैय्या विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या १४ वर्षाखालील मुलांच्या संघाने शालेय जिल्हास्तरीय टेबलटेनिस स्पर्धेमध्ये उपविजेतेपद पटकावले.
दि.२० ऑगस्ट २०२४ रोजी सह्याद्री ज्युनिअर कॉलेज संगमनेर येथे जिल्हास्तरीय शालेय १४,१७ व १९ टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.१४ वर्षा आतील मुलांच्या गटांमध्ये संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यांमधून १५ शाळांनी सहभाग नोंदवला होता.
श्री शारदा शाळेने पहिल्या फेरीच्या सामन्यात महर्षी कोपरगाव संघाचा ३-० ने, उपांत्य पूर्व सामन्यात पोद्दार संगमनेर संघाचा २-० तर उपांत्य फेरीच्या सामन्यात ध्रुव अकॅडमी संघाचा २-१ पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला.शारदा शाळेला अंतिम सामन्यात साखरवाडी संघाकडून निसटता पराभव पत्करावा लागला.१४ वर्षा खालील मुलांनी प्रथमच जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून अंतिम फेरी गाठली ही विशेष बाब म्हणता येईल.उपविजेते संघातील सिद्धांत जाधव, सक्षम सोनवणे, क्षितिज अल्हाट,अर्णव गगे, विराट घेगडमल,ऋतूजा बनकर आदींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.उपविजेता संघाचे शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,सर्व पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे, सौ पल्लवी ससाणे, सौ नैथलीन फर्नांडिस, क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर, गणेश वाघ शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.