Tuesday, July 1, 2025

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार

मुंबई:

प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ १४ जूनला पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतो. त्यावेळी रंगकर्मींना त्यांच्या रंगभूमीवरील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येते. यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. माटुंगा इथं यशवंत नाटय मंदिरला ‘पुरस्कार वितरण समारंभ’ शनिवार दिनांक १४ जून २०२५ ला दुपारी ४.०० वाजता संपन्न होणार आहे.

हा सोहळा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली तसंच उद्योगमंत्री आणि अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त उदय सामंत, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे तहहयात विश्वस्त शशी प्रभू, अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे विश्वस्त मोहन जोशी, अशोक हांडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या सोहळ्यात “गंधर्व भूषण जयराम शिलेदार संगीत नाट्य सेवा ट्रस्ट प्रस्तुत, मराठी रंगभूमी,पुणे निर्मित…. गोविंदायन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये संगीत शारदा, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक नाटकातील प्रवेशांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निनाद जाधव, श्रध्दा सबनीस, वैभवी जोगळेकर, सुदीप सबनीस, चिन्मय जोगळेकर आणि अस्मिता चिंचाळकर यांचा सहभाग असणार आहे.

या सोहळ्यात व्यावसायिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक सुनिल हरिश्चंद्र आणि स्मिता दातार (नाटक : उर्मिलायन), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अद्वैत दादरकर (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे (नाटक : मास्टर माइंड), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार निषाद गोलांबरे (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार राजेश परब (नाटक : गोष्ट संयुक्त मानापमानाची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक असेन मी नसेन मी (संस्था : स्क्रीप्टज क्रिएशन), सर्वोत्कृष्ट अभिनेता सुव्रत जोशी (नाटक : वरवरचे वधुवर), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता प्रशांत दामले (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हृषीकेश शेलार (नाटक : शिकायला गेलो एक), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना कुलकर्णी (नाटक : असेन मी नसेन मी), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री शर्मिला शिंदे (नाटक : ज्याची त्याची लव स्टोरी), सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री शुभांगी गोखले (नाटक : असेन मी नसेन मी) आणि अभिनयासाठी विशेष लक्षवेधी पुरस्कार निहारिका राजदत्त (नाटक : उर्मिलायन), नाट्य परिषद युवा नाट्य पुरस्कार सुशांत शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहेत.

तसेच नाट्यपरिषद- मुंबई कार्यकर्ता पुरस्कारासाठी महेश कापडोसकर, नाट्यपरिषद- शाखा कार्यकर्ता पुरस्कारासाठी सागर मेहेत्रे, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कारासाठी विक्रांत शिंदे, सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कारासाठी संतोष लिंबोरे (पाटील), गुणी रंगमंच कामगार सतीश काळबांडे, नाट्यसमीक्षक पुरस्कारासाठी अनिल पुरी, बालरंगभूमीवरील उल्लेखनीय कार्यासाठी मीनल कुलकर्णी, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संस्था पुरस्कारासाठी विजय नाट्य मंदिर, नाशिक, सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक पुरस्कारासाठी अजय कासुर्डे, रंगभूमी व्यतिरिक्त केलेल्या विधायक कार्यासाठी विद्याधर निमकर, विष्णु मनोहर, प्रसाद कार्ले, सर्वोत्कृष्ट लोककलावंत पुरस्कारासाठी डॉ. गणेश चंदनशिवे, भावेश कोटांगले, शाहिर राजेंद्र कांबळे, आसराम कसबे, कामगार रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कारासाठी डॉ. चंद्रकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

प्रायोगिक नाट्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक संगीत आनंदमठ (संस्था : कल्पक ग्रुप, पुणे), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक मिडिआ (संस्था : रुद्रेश्वर, गोवा), सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक मुकुल ढेकळे (सं. नाटक : मून विदाऊट स्काय), सर्वोत्कृष्ट पुरूष कलाकार यशवंत चोपडे (सं. नाटक : ब्लँक इक्वेशन), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पूनम सरोदे (सं. नाटक : वेटलॉस) प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (सं. नाटक : संगीत अतृप्ता) प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे ( सं. नाटक : संगीत आनंदमठ), प्रायोगिक सर्वोत्कृष्ट नाटक लेखक डॉ. सोमनाथ सोनवळकर (सं. नाटक : द फिलिंग पॅरोडॉक्स) यांची निवड करण्यात आली.

तसंच नाट्य क्षेत्रातील व्यावसायिक / प्रायोगिक नाट्य निर्मात्यांना आणि नाट्य व्यवस्थापकांना सहकार्य केल्याबद्दल मा. दिनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या प्रशासकीय अधिकारी वृषाली शेट्ये यांना आणि ५१ वर्ष प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या अनुराग, कल्याण या संस्थेला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सोहळा नाटय परिषदेच्या सर्व सभासद आणि रसिकांना प्रवेश विनामूल्य असून काही जागा राखीव ठेवण्यात येणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles