Monday, June 16, 2025

बीड शहर पोलिसांची कामगिरी 48 तासात चोरीस गेलेले दहा लाखाचे सोने मिळवले परत

.
.बीड

दिनांक आठ जून 2024 रोजी, डॉक्टर लक्ष्मीकांत आंधळे यांच्या घरातून ते बाहेर गेले असताना घरात प्रवेश करून कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या कपाटात ठेवलेले गळ्यातली चैन, गंठण, आणि अंगठी असे 11 तोळे सोने चोरट्याने चोरी करून नेले होते.. दिवसा चोरी झाल्याने पोलिसांपुढे याची आव्हान तयार झाले होते.

बीड शहर पोलिसांनी हे आव्हान स्वीकारत 48 तासात आरोपींना शोधून काढत मुद्देमाल जप्त केला.


सीसीटीव्हीच्या मदतीने त्या भागामध्ये कोण कोण गेले आहे यावर लक्ष ठेवण्यात आले. यातून एका महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडून संपूर्ण गेलेला ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीचे नाव लक्ष्मी प्रमोद वडमारे राहणार पंचशील नगर बीड असे आहे. दोनच दिवसात पोलिसांनी चोरीस गेलेल्या मुद्देमाल परत मिळवल्यामुळे फिर्यादीने समाधान व्यक्त केले आहे.


पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत आणि अपर पोलिस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक श्री शितल कुमार बल्लाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाबा राठोड पोलीस अंमलदार संजय राठोड, मनोज परजणे गहिनीनाथ बावनकर राम पवार यांनी नमूद गुन्हा उघडकीस आणला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles