Homeप्रादेशिक बातमीनिदा खानला आश्रय दिला,मतीन पटेलांवर बुलडोझर कारवाई; घर, कार्यालयासह सहा आस्थापनांवर...

निदा खानला आश्रय दिला,मतीन पटेलांवर बुलडोझर कारवाई; घर, कार्यालयासह सहा आस्थापनांवर हातोडा

छत्रपती संभाजीनगर

Nashik tcs case nida khan relation छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरासह कार्यालय आणि सहा व्यापारी आस्थापनांवर आज सकाळी महानगरपालिकेने बुलडोझर कारवाई केली. अनधिकृत बांधकामाच्या आरोपाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नारेगाव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

महापालिका प्रशासनाने पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात तीन जेसीबीच्या सहाय्याने पटेल यांच्या मालमत्तांवर कारवाई सुरू केली. सकाळपासूनच परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विरोधाची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क होते.

टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. तिला मतीन पटेल यांनी आपल्या घरात आश्रय दिल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेनंतर ९ मे रोजी महानगरपालिकेने पटेल यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावत ७२ तासांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, महापालिकेच्या नोटिशीला पटेल यांनी कोणतेही समाधानकारक कायदेशीर उत्तर दिले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच, खंडपीठात धाव घेतल्यानंतरही त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज सकाळी प्रत्यक्ष पाडकामाची कारवाई करण्यात आली.

कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments