बीड जिल्ह्यात सोमवारची सुट्टी रद्द
बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी असलेली ईद-ए-मिलाद ची सुट्टी प्रशासनाने रद्द केली असून त्या ऐवजी ही सुट्टी 18 बुधवार रोजी देण्यात आली आहे.
राज्यात 16 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद आणि गणपती विसर्जन हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्यामुळे आणि दोन्ही सणांच्या दिवशी दोन्ही धर्मीय नागरिक मिरवणुका काढत असतात. त्या अनुषंगाने जातीय तेढ अथवा वाद निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने 16 सप्टेंबर ची सुट्टी मुंबई आणि मुंबई उपनगर मध्ये रद्द करण्यात आली होती. त्या अनुषंगाने याच राजपत्राच्या धरतीवर त्या त्या जिल्ह्यातील प्रशासनाला सुट्टी कधी द्यायची यासंदर्भातील अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाने आपल्या सुट्ट्या आपल्या पद्धत जाहीर केले आहेत.
बीड जिल्ह्यातील ईद-ए-मिलाद ची सुट्टी बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिले आहेत