Saturday, September 6, 2025
Homeजिल्हा बातमीकुंडलिक खांडे प्रकरणी शिरूर शहर कडकडीत बंद;पुतळा जाळून केला निषेध

कुंडलिक खांडे प्रकरणी शिरूर शहर कडकडीत बंद;पुतळा जाळून केला निषेध

शिरूर

Beed Shivsena kundlik khande row शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्या ऑडियो क्लीप प्रकरणी सकल ओबीसी समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला.या वेळी सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिजामाता चौकात एकत्र येऊन कुंडलिक खांडे यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी जमलेल्या ओबीसी समाजाच्या लोकांनी कुंडलिक खांडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.ओबीसी समाजाच्या वतीने सकाळी शहरात फेरी मारण्यात आली.दिवसभर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

27 जून रोजी कुंडलिक खांडे नावाच्या व्यक्तीने ओबीसी समाजाचे दैवत तसेच पालकमंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्या विषयी काही वाईट वक्तव्य केले होते.त्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या म्हणून शनिवारी बंदचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी माजी जि.प.सदस्य दशरथ वनवे,युवा नेते नवनाथ ढाकणे,दिलीप खेडकर,डॉ.मधुसूदन खेडकर,प्रकाश खेडकर,सुरेश उगलमुगले,भागवत वारे,प्रकाश बडे,सावळेराम जायभाये,मच्छिंद्र सानप,कालिदास आघाव,बाळू गर्जे यांच्यासह ओबीसी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments