शिरूर
Demand for Congress to take seat of Ashti Vidhan Sabha काँग्रेस पक्षाची जिल्हास्तरीय आढावा बैठक जेष्ठ नेते तथा माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली केज येथे संपन्न झाली.
या वेळी आष्टी विधानसभा मतदार संघाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.महाविकास आघाडी मार्फत ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेण्यात यावी ही काँग्रेस पक्षाची हक्काची जागा असून या मतदारसंघात इतर पक्षापेक्षा काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे त्या करिता आष्टी विधानसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाला सोडून घ्यावा अशी मागणी मतदार संघातील कार्यकर्त्यांनी केली आहे.
या वेळी काँग्रेसचे जिल्ह्याचे लोकनेते माजी मंत्री अशोकराव पाटील,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख उपाध्यक्ष राहुल सोनवणे यांची उपस्थिती होती.
या बैठकीला काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर तात्या केदार,महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मीनाक्षीताई पांडुळे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब टाचतोडे,पाटोदा अध्यक्ष राहुल जाधव आष्टी तालुकाध्यक्ष रविंद्र काका ढोबळे यांच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ नेते सेवादल तालुका अध्यक्ष रामेश्वर शेळके तालुका उपाध्यक्ष अशोकराव बहिरवाळ शिरूर युवा तालुका अध्यक्ष अशोक केदार,एस.टि.एस. जिल्हाध्यक्ष महादेव सावंत पाटोदा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील काळे कानिफनाथ विघ्ने यांची उपस्थिती होती.
भास्कर केदार यांचा पक्षाने विचार करावा तालुक्यातील वारणी येथील रहिवासी तसेच काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भास्कर केदार यांचा परिचय आहे.आतापर्यंत पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडल्या असून भविष्यात जर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडवून घेण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले तर भास्कर केदार यांच्या नावाचा पक्षाने विचार करावा अशी मागणी पुढे येत आहे.