Monday, December 2, 2024

टेंभुर्णी येथे 51 घरकुलांना मंजुरी -सरपंच मिथुन डोंगरे यांच्या पाठपुराव्याला यश

शिरूर:

51 shelters sanctioned at Tembhurni तालुक्यातील टेंभुर्णी येथे यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत 51 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.सरपंच मिथुन डोंगरे यांनी माजी आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून सातत्याने पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे या संदर्भात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.

राज्य शासनाच्या मागास कल्याण विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत गरीब आणि गरजू घटकांना याचा लाभ देण्यात येणार आहे.

मिथुन डोंगरे यांनी आपल्या एक ते दिड वर्षांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली असून त्या मध्ये शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक जलसिंचनच्या चाळीस विहिरींसह वीस गायगोठे,सहा पांदण रस्ते,मंदिरासाठी भव्य सभामंडप आणि पेव्हर ब्लॉक,सिमेंट रस्त्यांची कामे करण्यासह शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याच्या कामांचा समावेश आहे.

भविष्यात देखील शासनाच्या वतीने ज्या काही गरजू लोकांसाठी आणि गावाच्या विकासासाठी योजना असतील त्या देखील राबविण्यासाठी आपण माजी आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे देखील सरपंच मिथुन डोंगरे यांनी सांगितले.

घरकुल योजनेचा लाभ दिल्याबद्दल लाभार्थ्यांच्या वतीने माजी आमदार सुरेश धस यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles