Friday, September 5, 2025
Homeक्राईम बातमीलोणावळा शहरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

लोणावळा शहरात तरुणीवर सामूहिक बलात्कार

लोणावळा

lonavala crime rape case news लोणावळा शहरात एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

शनिवारी (२६ जुलै) चालत्या गाडीत सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना लोणावळा शहरात रात्री ९ वाजता (२५ जुलै) ते शनिवारी सकाळी घडली.

लोणावळा शहर पोलिस ठाण्यात एका कारमधील तीन जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी कार थांबवून मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणावळा शहर पोलिस निरीक्षक राजेश रामघरे यांनी सांगितले की, पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुंगार्ली परिसरातील नारायणी धाम मंदिराजवळ रस्त्याने जात असताना पीडित मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्यात आले. त्यानंतर, तक्रारीत म्हटले आहे की, तीन जणांनी तिचे हात बांधून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर, नांगरगावमधील रस्त्याच्या कडेला मुलीला फेकून देण्यात आले.

शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर, पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारा तासांच्या आत या प्रकरणातील एका आरोपीची ओळख पटली आणि लोणावळा शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास सुरू असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेनंतर बारा तासांनंतर एक जण ताब्यात

घटनेची माहिती मिळाल्यानंतर बारा तासांत या प्रकरणातील एका आरोपीला लोणावळा शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments