google.com, pub-5920674810493689, DIRECT, f08c47fec0942fa0
Home Uncategorized मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबर पासून बसणार आमरण उपोषणाला

मनोज जरांगे पाटील 17 सप्टेंबर पासून बसणार आमरण उपोषणाला

0
40

जालना

सरकार दरबारी प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी 17 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.

याबाबतची घोषणा त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटा येथे पत्रकारांशी बोलताना केली.

17 सप्टेंबर हा मराठवाड्याचा मुक्ती संग्राम दिन आहे. याच दिवशी महाराष्ट्रातील मराठा बांधवांच्या मागणी साठी उपोषणाची घोषणा त्यांनी केली.
16 तारखेला रात्री 12 वाजे पासून कठोर,बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी समाजाला शांत राहण्याचे आणि स्थिर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here