Sunday, January 19, 2025

कोपरगाव तालुका बुद्धिबळ स्पर्धेत शारदा शाळेचे वर्चस्व

.

बुद्धिबळ स्पर्धेत सरोदे,शिंदे,आभाळे तालुक्यात प्रथम

कोपरगाव (गौरव डेंगळे)

येथील विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालय व कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या वतीने संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.वयोगट १४,१७ व १९ मुला-मुलींच्या या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये तालुक्याभरातून १५० ते २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.


मुलींच्या स्पर्धेत वय वर्ष १४ वर्षाखालील गटामध्ये स्वरा दत्तू शिंदे हिने प्रथम क्रमांक तर १७ वर्षाखालील मुलींच्या गटात ईश्वरी विशाल सरोदे हिने प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.


मुलांच्या १७ वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेत शाळेचा नील आभाळे (प्रथम), पृथ्वीराज देवकर (द्वितीय),साईज गायकवाड (तृतीय) तर नचिकेत काठमोरे याने (चतुर्थ क्रमांक) पटकावला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले.यशस्वी विद्यार्थ्यांना बुद्धिबळ खेळाचे तज्ञ प्रशिक्षक विशाल अल्हाट यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.


यावेळी विजयी खेळाडूंचे शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या शुभांगी अमृतकर,सर्व सुपरवायझर प्रज्ञा पहाडे,पल्लवी ससाणे,नैथिलीन फर्नांडिस, क्रीडा विभाग प्रमुख धनंजय देवकर,खो खो प्रशिक्षक गणेश वाघ,बास्केटबॉल प्रशिक्षक गणेश मोरे,व्हॉलिबॉल प्रशिक्षक हिमानी पटेल,कराटे प्रशिक्षक वर्षा देठे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest Articles