नवी दिल्ली. (गौरव डेंगळे)
भारतीय शालेय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल अशी ६९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच नवी दिल्लीत पार पडली. School Games Federation of India (SGFI) च्या या ऐतिहासिक सभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे श्रीरामपूर (महाराष्ट्र) येथील सुपुत्र पार्थ दोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली ही सभा यशस्वी झाली. आपल्या कार्यकुशलतेने व दूरदृष्टीने पार्थ दोशी यांनी महाराष्ट्राचा व देशाचा गौरव उंचावला आहे.
महाराष्ट्राचा सुपुत्र राष्ट्रीय पातळीवर चमकला!!!
सुमारे आठ महिन्यांपूर्वी पार्थ दोशी यांची SGFI च्या कार्यकारी अधिकारी (Executive Officer) पदावर निवड झाली. केवळ अल्पावधीतच त्यांनी महासंघाच्या कार्यप्रणालीत आमूलाग्र बदल घडवत महासंघाला नव्या यशशिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वात SGFI ने शालेय क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर आणि खेळाडू केंद्रित धोरणे राबवली आहेत.
ऐतिहासिक सामंजस्य करार — निधी संकलनास नवे वळण!!!
SGFI च्या अध्यक्ष श्री. दीपक कुमार (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पार्थ दोशी यांच्या सक्रिय सहभागातून महासंघाने निधी संकलनासाठी शशक्त डेव्हलपमेंट अँड एम्पावरमेंट फाउंडेशन बरोबर ऐतिहासिक MoU केला आहे. या करारामुळे देशातील नामांकित कंपन्यांच्या CSR प्रकल्पांमधून आणि विविध प्रायोजकांकडून महासंघाला आर्थिक पाठबळ मिळणार आहे. या करारानंतर प्रतिकात्मक स्वरूपात ₹१० लाखांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला, जो महासंघाच्या शाश्वत विकासाचा नवा अध्याय ठरला आहे.
डिजिटायझेशनद्वारे कार्यपद्धतीत क्रांती!!!
पार्थ दोशी यांच्या नेतृत्वाखाली महासंघाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून नोंदणी व पात्रता तपासणी प्रक्रियेत पारदर्शकता व कार्यक्षमता आणली आहे. आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ओळख प्रणालीमुळे खेळाडूंची खरी पात्रता सहज निश्चित होणार असून अपात्रतेला पूर्णविराम मिळणार आहे. यामुळे महासंघाच्या कामकाजात विश्वासार्हता, गती आणि सुरक्षितता यामध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे.
राष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळाडूंना अधिक सुविधा!!!
राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये खेळाडूंना दर्जेदार सुविधा व उत्तम वातावरण मिळावे यासाठी महासंघाने आयोजकांना वित्तीय सहाय्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. चांगली निवास व्यवस्था, दर्जेदार आहार, उत्तम मैदान व अन्य सुविधा या सहाय्यामुळे उपलब्ध होतील. यामुळे स्पर्धकांच्या कामगिरीत निश्चितच सकारात्मक बदल दिसून येतील.
पार्थ दोशी यांची दूरदृष्टी आणि कार्यतत्परता कौतुकास्पद!!!
पार्थ दोशी यांनी केवळ महासंघाच्या यशासाठीच नव्हे तर देशातील लाखो शालेय खेळाडूंना दर्जेदार संधी उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध प्रयत्न सुरू ठेवले आहेत. देशाच्या क्रीडा क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणाऱ्या या तरुण नेतृत्वाने महाराष्ट्राचा अभिमान उंचावला आहे.
“शालेय पातळीवरूनच खेळाडूंना योग्य दिशा, सुविधा व प्रोत्साहन मिळाले पाहिजे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. शाळा हीच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविणारी पहिली प्रयोगशाळा आहे,” असे पार्थ दोशी यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
महाराष्ट्राचा अभिमान — श्रीरामपूरचे भूषण!!!
पार्थ दोशी यांच्या या यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः श्रीरामपूरमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. त्यांच्या यशाची दखल विविध क्रीडा संघटना, प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते व नागरिकांकडून घेतली जात आहे. युवकांनी पार्थ दोशी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी असे आवाहन अनेकांनी केले आहे.
🌟 “पार्थ दोशी यांच्यासारख्या तळमळीच्या नेतृत्वामुळेच भारत शालेय क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास घडवू शकतो.”