shirdi bjp Amit Shah local body elections 2024 मध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाला. या विजयामध्ये राज्यातील जनतेचा आणि लाडक्या बहिणीचा मोठा सहभाग आहे. आता 2025 मध्ये दिल्लीच्या विजयाने भाजपच्या विजयाची सुरुवात होणार असल्याचे सूतोवाच करून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिर्डी येथे फुंकला.
शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाच्या महाविजय अधिवेशनात ते बोलत होते. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा एक दिवसीय महाविजय अधिवेशन शिर्डी येथे घेण्यात आले. या अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस नवनियुक्त भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, छत्रपती उदयनराजे भोसले, भाजपचे महासचिव विनोद तावडे, भाजप कोर कमिटीतील सदस्य आणि विविध मंत्री या अधिवेशनाला उपस्थित होते.
यावेळी आपल्या भाषणात बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले की 2024 हे वर्ष भारतीय जनता पार्टीसाठी महत्त्वाचे ठरले. यावर्षी विविध निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले. आता 2025 च्या महाविजेयाची सुरुवात दिल्ली विधानसभा निवडणुकीद्वारे होणार आहे.
भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार असून आठ तारखेला सर्वांनी फटाके वाजवून जल्लोष करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आपल्या भाषणात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत राज्यातील जनतेने त्यांना आपली जागा दाखवली असल्याचे सांगितले.
राज्यातील जनतेने परिवार वाद नाकारला असून खरी शिवसेना कोणती आणि खरी राष्ट्रवादी कोणती हे दाखवून दिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही अशा प्रकारचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केले.
देशातील महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर असून यासाठी राज्यातील जनतेने मोठे काम केले आहे. विकसित महाराष्ट्राशिवाय विकसित भारत होऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आपल्या भाषणांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी अराजकता पसरण्याचा प्रयत्न केला फेक नारेटिव्ह पसरण्याचा प्रयत्न केला, त्यांना मतदारांनी चपराग दिली असून निवडणुकीत दिलेले प्रत्येक आश्वासन आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ReplyReply allForwardAdd reaction |