Home राजकीय बातमी अभिनेत्री प्राजक्ता माळी वक्त्यव्या बाबत आमदार सुरेश धस यांनी केली दिलगिरी व्यक्त!

अभिनेत्री प्राजक्ता माळी वक्त्यव्या बाबत आमदार सुरेश धस यांनी केली दिलगिरी व्यक्त!

0
40
Mla Suresh Dhas apologies prajakta Mali

आष्टी

Mla Suresh Dhas apologies prajakta Mali आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.

मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रश्न सध्या गाजत आहे. यासंदर्भात आमदार सुरेश धस यांनी विधान करताना परळी येथील विविध कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिला कलाकारांच्या संदर्भात वक्तव्य केले होते. यामध्ये मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा समावेश होता. त्यांच्या बद्दल काढलेल्या वक्तव्याचा निषेध प्राजक्ता माळी यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन केला होता.

तसेच यासंदर्भात राज्य महिला आयोगाकडे त्यांनी तक्रारही दाखल केली होती. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन या संदर्भात कारवाई करण्याची मागणी केली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यासंदर्भात पोलीस महासंचालकांना पत्र देऊन या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान सुरेश धस यांनी आपण माफी मागे मागणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर राज्यातील अनेक भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

त्यांनी आज  प्राजक्ता माळी यांच्यासह कुठल्याही महिला कलाकाराचे मन दुखावले असल्यास आपण दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here