Friday, September 5, 2025
Homeप्रादेशिक बातमीराज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार आबासाहेब खिलारे यांना जाहीर

राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार आबासाहेब खिलारे यांना जाहीर

कडा

State adarsh grampanchayat adhikari purskar राज्य शासनाचे 2023 आणि 24 या वर्षाचे राज्यस्तरीय राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सन 2022-23 चा आदर्श ग्राम पंचायत अधिकारी पुरस्कार कडा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आबासाहेब दिलीपराव खिलारे यांना छत्रपती संभाजी नगर विभागातून जाहीर झाला आहे.
तर 2023-24 चा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार छत्रपती संभाजी नगर विभागातून बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण बाबासाहेब सानप यांना जाहीर झाला आहे.

सन 2022-23 च्या मधील 33 ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना तर सन 2023-24 साठी च्या 32 ग्रामपंचायत अधिकारी यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. हे पुरस्कार यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात वाटप करण्यात येणार आहे.
या दोन्ही ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments