google.com, pub-5920674810493689, DIRECT, f08c47fec0942fa0
Home प्रादेशिक बातमी जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्वत उत्पादन मिळेल- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

जमिनीची धूप थांबविली तरच भविष्यात शाश्वत उत्पादन मिळेल- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

0
21

देवराज मंतोडे,प्रतिनिधी
राहुरी विद्यापीठ, दि. 17
Sustainable production will be achieved in the future only if soil erosion is stopped जमिनीतील मातीची धूप कमी करणे, पाणी व्यवस्थापन करणे या सारखे उपाय योजून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी लक्ष दिले तरच भविष्यात जमीन शाश्वत उत्पन्न देईल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठातील काटेकोर शेतीसाठी डिजीटल तंत्रज्ञानावर आधारीत सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत मृदेची धुप, पोषकता व मृदा संवर्धन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. यावेळी प्रमुख्य व्याख्याते म्हणुन भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील मृदा व जलसंवर्धन विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. राजीवकुमार सिंग उपस्थित होते.

याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख तथा कुलसचिव तथा सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे व पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. राजीवकुमारी सिंग यांनी सद्यस्थितीतील भारताच्या जमीन वापराच्या पध्दतीतील बदल, जमीनीचा र्हास आणि पोषकता, पाणलोट स्थितीतील बदल, पाणलोट विकासाचे मुल्यांकण आणि व्यवस्थापन या विषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक डॉ. मुकुंद शिंदे यांनी तर आभार मृद व जलसंधारणाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्ही.एन. बारई यांनी मानले. हे व्याख्यान आयोजन करण्यामध्ये प्रकल्पाच्या संशोधन सहाय्यक डॉ. शुभांगी घाडगे यांनी परिषम घेतले. या कार्यक्रमासाठी शास्त्रज्ञ, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here