बिबट्याचे अवयव तस्करी करताना दोन अटकेत

0
68
2 leopard poachers arrested in sangamner ahmednagar
2 leopard poachers arrested in sangamner ahmednagar
संगमनेर,
 2 leopard poachers arrested in sangamner ahmednagar अहमदनगर जिल्ह्यातील हिवरा पावसा टोल नाक्यावर बिबट्या चे विविध अवयव खरेदी विक्रीसाठी आणत असल्याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर सापळा रुचून दोन आरोपींना अटक केली तर एक जण फरार झाला.
ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी संगमनेर यांनी केली आहे. श्रीराम यादव सरोदे वय 34 राहणार चंदनपुरी,तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, सुधीर विजय भालेराव वय 30 राहणार चंदनपुरी, तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर, या दोघांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
तर यातील एक आरोपी सुशांत उत्तम भालेराव राहणार चंदापूरी हा फरार झाला.
बिबट्या bibtya या वन्य प्राण्याच्या दात सुळे मिशा यांची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती त्यानुसार त्यांनी हा सापळा रुचून या आरोपींना अटक केली.
त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वन्यजीव अधिनियम कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय वन अधिकारी संदीप पाटील आणि उप वनसंरक्षक जुन्नर अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई वनपरिक्षेत्र संगमनेर भाग 1 चे  सचिन लोंढे, वनविभाग जुन्नर यांची टीम रईस मोमीन, संदीप येवले, कृष्णा कुणाल, तन्मय बागल, हरून सय्यद, विक्रांत बोराडे, अरुण देशमुख, गजानन पवार यांनी केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here