सहायक पोलीस निरीक्षक ACB च्या जाळ्यात

0
98
ahmednagr acb trap
ahmednagr acb trap

अहमदनगर

ahmednagr acb trap येथील कोतवाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात घडली.

कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार यांनी तक्रारदार यांना आठ दिवसापूर्वी 20 हजार रुपयांची लाच मागितली होती.

ट्रक कारच्या अपघातात जिल्हा परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

तक्रारदार यांचे विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे चार्जशीट मधून नाव वगळावे आणि मदत व्हावी या उद्देशाने पवार याने तक्रारदार यांच्याकडे 20 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर प्रत्यक्ष कोतवाली पोलीस ठाण्याच्या परिसरात पवार हे लाच घेताना रंगेहात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली.हा सापळा नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here