सोलापूर
solapur sulfer blast news शहरातील जुनी मिल कंपाऊंड शेजारी असलेल्या सहारा गन हाऊस मधील काही साहित्याची वाहतूक करण्यापूर्वी ते साहित्य कार मधून खाली काढत असताना झालेल्या स्फोटात संबंधित कामगाराच्या पायाच्या चिंधड्या उडाल्याने तो कामागार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली
सोमवारी सायंकाळी सहा वाजून 21 मिनिटांनी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार केदारनाथ सिद्धाप्पा छत्रे वय 53 असे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गंभीर व्यक्ती हा सहारा गन हाऊस मध्ये कामगार आहे.
जुनी मिल येथील दुकानातून एम एच 45 एन ३८ १३ या गाडीमध्ये काहीतरी साहित्य जात होते. संबंधित जखमी कामगार ते साहित्य घेऊन गाडीच्या डिग्गी मध्ये ठेवत असताना डिग्गी उघडताना त्यांनी ते साहित्य अचानक रस्त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला ते साहित्य खाली टाकताच प्रचंड मोठा स्फोट झाला. या स्फोटात संबंधित कर्मचारी याचा उजव्या पायाच्या जागेवरच चिंधड्या उडाल्या.
सामाजिक कार्यकर्ते तथा शिखर पहारिया फाउंडेशनचे प्रमुख राज सलगर यांनी तात्काळ जाऊन जखमी कामगाराला आपल्या वाहनामध्ये येऊन सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वेळेवर उपचार झाल्याने सध्या त्याची प्रकृती गंभीर जरी असली तरी स्थिर असल्याचे समजले.