Homeकृषी बातमीmpkv rahuri seed production महात्मा फुले कृषि विद्यापीठात बिजोत्पादन हे विद्यापीठाचे महत्वाचे...

mpkv rahuri seed production महात्मा फुले कृषि विद्यापीठात बिजोत्पादन हे विद्यापीठाचे महत्वाचे उद्दिष्ट्य


राहुरी विद्यापीठ,


mpkv rahuri seed production महात्मा फुले कृषि विद्यापीठाने सन 2025 – 26 मध्ये विविध पिकांचे 8456 क्विंटल बियाणे तयार केले. पुढील वर्षी विद्यापीठ सुमारे 8637 क्विंटल बियाणे निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यामुळे शेतकर्यांना विविध पिकाच्या वाणांचे सत्यप्रत बियाणे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. बिजोत्पादन हे विद्यापीठाचे महत्वाचे उद्दिष्ट्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे बियाणे उत्पादन आढावा व खरीप हंगामासाठीची बियाणे उत्पादनासंबंधीचे नियोजन बैठक कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. या बैठकीच्या उपाध्यक्षपदी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, अधिष्ठाता (कृषि) डॉ. साताप्पा खरबडे व नियंत्रक श्री. सदशिव पाटील, बैठकीचे निमंत्रक प्रमुख शास्त्रज्ञ (बियाणे) डॉ. नरेंद्र काशीद उपस्थित होते.


कुलगुरू डॉ. विलास खर्चे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात उत्कृष्ट बियाणे उपलब्ध होण्यासाठी जास्तीत जास्त बीजोत्पादन घेणे हे विद्यापीठाचे उद्दिष्ट असले पाहिजे. हे करत असताना जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात जैविक खते तसेच कंपोस्ट खते द्यायला हवीत असे यावेळी ते म्हणाले. बैठकीच्या सुरुवातीला डॉ. नरेंद्र काशीद यांनी स्वागत तर डॉ. प्रशांत बोडके यांनी विद्यापीठ तयार करत असलेल्या विविध पिकांच्या बियाण्यांसंदर्भात सविस्तर माहिती दिली.

यावेळी कृषिविद्या विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. आर. पी. आंधळे यांनी अल निनोचा येत्या खरीप हंगामावर पडणारा प्रभाव, कृषि संशोधन केंद्र, जळगाव येथील तीळ पैदासकार डॉ. एस. डी. राजपूत यांनी तीळ, मूग व उडीद उत्पादन तंत्रज्ञान, कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज येथील सोयाबीन पैदासकार डॉ. ए. बी. राजगुरू यांनी सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान,

डॉ. नरेंद्र काशीद यांनी भात उत्पादन तंत्रज्ञान व कडधान्य सुधार प्रकल्पातील डॉ. महेश भारती यांनी तूर उत्पादन तंत्रज्ञान यावर सादरीकरण केले. बीज उत्पादन अधिकारी डॉ. कैलास गागरे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत राबविण्यात येणार्या विविध शेतपिकांच्या बीज उत्पादन कार्यक्रमांचे सादरीकरण केले. डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी भाजीपाला बीज उत्पादन व डॉ. बी.टी. पाटील यांनी फळ पिकांच्या रोपे उपलब्धीचे सादरीकरण केले.


याप्रसंगी डॉ. राजेंद्र भिलारे यांनी विद्यापीठांतर्गत राबविण्यात येत असलेल्या ऊस बिजोत्पादन त्याचप्रमाणे डॉ. उत्तम कदम, डॉ. आर. टी. गायकवाड, डॉ. भीमराज कांबळे या विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागांतर्गत उत्पादित विविध फळे पिकांच्या रोपांची उपलब्धता, जैविक खते, जैविक औषधे, सूक्ष्म अन्नद्रव्ये तसेच डॉ. उल्हास गायकवाड यांनी गांडूळ खताचे निर्मितीबाबत माहिती दिली.

याप्रसंगी बियाणे विभागाच्या लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी या वर्षांमध्ये सेवानिवृत्त होणार्या धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बबनराव इल्हे, कोल्हापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शैलेंद्र कांबळे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. विजय शेलार, इगतपुरी येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. हेमंत पाटील,

गवत संशोधन योजनेचे संशोधन अधिकारी डॉ. लक्ष्मण तागड, कृषि विद्या विभागांतर्गत असलेल्या रोपवाटिकेचे प्रभारी अधिकारी प्रा. मंजाबापू गावडे व मोहोळ येथील कृषि संशोधन केंद्रातील कृषि सहाय्यक श्री. पोळ या अधिकारी व कर्मचार्यांचे सत्कार करण्यात आले.

ही आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी डॉ. कैलास भोईटे, प्रा. बी.टी. शेटे, डॉ. अनिल सूर्यवंशी, डॉ. अविनाश कर्जुले, श्री. बी.जी. राठोड, श्री. आदिनाथ ढगे, श्री. संदीप कोकाटे व बियाणे विभागातील सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले. या आढावा बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. डी. डी. गायकवाड यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments