Homeक्राईम बातमीनीट पेपरफुटी प्रकरणी राहुरी येथील तरुणाला सीबीआयने केली अटक

नीट पेपरफुटी प्रकरणी राहुरी येथील तरुणाला सीबीआयने केली अटक

अहिल्यानगर

neet ug paper leak case ahilyanagar नीट neet पेपरफुटी प्रकरणी CBI ने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावातील धनंजय लोखंडे याला ताब्यात घेतले आहे. दरम्यान पुण्यातून मनीषा वाघमारे या महिलेला ताब्यात घेतले आहे.


केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यातील एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे.त्याच बरोबर त्याचे दोन साथीदारांनाही सीबीआई ने ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर यातील दोघांना सीबीआयने सोडून दिले तर धनंजय लोखंडे याला अटक करण्यात आली.

राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर या गावातून धनंजय लोखंडे या युवकाला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली असून त्याला न्यायालयात नेण्यात आले आहे. न्यायालयातून त्यांना ट्रांझिट रिमांड घेऊन लोखंडे यास सीबीआयचे अधिकारी दिल्लीला नेण्यात आले.


लोखंडे याची दिवसभरामध्ये सकाळी 11 वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. त्याच्यासोबत इतर दोघांनाही सीबीआयने ताब्यात घेतले होते मात्र त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले.


या तपासाच्या अनुषंगाने बुधवारी सकाळपासून CBI चे विशेष पथक अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने संशयित व्यक्तीचा शोध घेत त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दिवसभर त्याची कसून चौकशी करण्यात आली.

सीबीआयचे तीन पथके अहिल्यानगर शहरांमध्ये यासंदर्भातील डिटेल माहिती घेत होते त्यांनी विविध बँकांमध्ये जाऊन धनंजय लोखंडे यांच्या झालेल्या व्यवहाराचे माहिती घेतली.

या व्यक्तीचा पेपरफुटी रॅकेटशी नेमका काय संबंध आहे, प्रश्नपत्रिका पुरविण्याच्या साखळीत त्याची भूमिका होती का, आर्थिक व्यवहार झाले होते का, यासह अनेक मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular